जनुकीय बदलामुळे कोरोना घातक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 01:07 PM2020-04-06T13:07:55+5:302020-04-06T13:08:05+5:30
डॉ. एन. जी. मराठे : अमेरिका आदी देशांपेक्षा भारतात व्हायरसची तीव्रता कमी
मुक्ताईनगर : ईन्फ्लुइंजा सारख्या वायरसमध्ये जनुकीय बदल होऊन त्याने कोरोनाचे रूप घेतले. आणि त्यापासून कोविड १९ या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. रोगप्रतिकार शक्ती या आजारात जेवढी महत्वाची आहे, त्या पेक्षा महत्वाचे म्हणजे याची लागणच होऊ न देणे. यासाठी सोशल डिस्टनसिंग हा महत्वाचा उपाय आहे, अशी माहिती ह्रदयरोग तज्ञ तथा नाक कान घसा रोग तज्ञ डॉ. एन. जी. मराठे यांनी दिली.
कोरोनाचा व्हायरस इन्फ्लूएंजा विषाणू सारखाच असून संसर्ग झाल्यास सर्दी पडसे खोकला व ताप ही लक्षणे दिसतात.
वृद्धामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी
शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असेल तर शरीर त्या विषाणूला खातमा करतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती उदाहरणार्थ डायबिटीज, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, प्रेग्नन्सी, अस्थमा, टीबी एचआयव्हीग्रस्त, कॅन्सरग्रस्त, दहा वषार्खालील मुलं व ६० वर्षावरील व्यक्ती यात असू शकतात.
नॉर्मल व्यक्तीही व्हायरस कॅरीअर
जर एखाद्या नॉर्मल व्यक्तीला कोरोना किंवा इतर कुठल्याही हायरसचा संसर्ग झाला तर त्याची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असल्याने त्यामध्ये कुठले लक्षण दिसत नसतात पण अशा लोकांच्या शिंकण्यातून व खोकल्यातून विषाणू बाहेर पडतात व इतरांना संसर्ग होतो. अशा व्यक्तींना कॅरिअर म्हणतात. त्यासाठी शासनाने लॉकडाऊन ही संकल्पना आणलीे.
प्रत्येक व्हायरस किंवा बॅक्टेरिया वातावरणातील बदलानुसार म्हणजे थंड व उष्ण, पावसाळी स्थितीनुसार व मनुष्याच्या जीवनशैली नुसार जनुकीय जडणघडण होत असते. म्हणून कुठल्याही रोगजंतू काही ठिकाणी खूप अॅक्टिव्ह तर काही ठिकाणी पॅसिव्ह म्हणून कार्यरत असतो. आज अमेरिकेत इटली, फ्रान्स, जपान, स्पेन येथे कोरोना जीव घेणाखेळ खेळत आहे त्याठिकाणी तो व्हायरस म्यूटेड झालेला असून अॅक्टिव्ह मोडमध्ये काम करताना दिसत आहे तर इतर देशांमध्ये मात्र त्याची तीव्रता कमी आहे. व्हायरस तोच असतो परंतु वातावरणातील बदलामुळे तो कमी अधिक त्रासदायक ठरतो. संसर्गजन्य साथीच्या आजारांवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे त्यांचा प्रसार रोखणे असून मास्कचा वापर करणे, वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुणे इत्यादी होय.
चांगला आहार आणि योगा उपयोगी
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विटामिन सी च्या गोळ्या घेणे जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा जास्त वापर फळात गाजर, पपई, संत्री, मोसंबी, टोमॅटो, त्यांचे सेवन करणे व भरपूर पाणी पिणे, योगासन मध्ये अनुलोम-विलोम करणे कपालभाती व्यायाम करणे. धूम्रपान व मद्यपान टाळणे, कमीत कमी सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे.
सोशल डिस्टनींग मोफतचा इलाज
कोरोना वर औषधी काही प्रमाणात प्रभावी असून कोरोना वरील लस विकसित झाली आहे. प्राण्यांना व मनुष्य यांच्यावर प्रयोग सुरू आहेत ते जर यशस्वी झाले तर येत्या काळात कोवीड १९ वर मात होऊ शकते. तोपर्यंत सोशल डिस्टनसिंग हा मोफतचा उपाय महत्त्वाचा आहे.