बोदवडमध्ये कोरोनाने वृद्धेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 15:21 IST2020-08-06T15:19:55+5:302020-08-06T15:21:34+5:30
तालुक्यात कोरोनामुळे उपचार दरम्यान बळीची संख्या १० झाली आहे

बोदवडमध्ये कोरोनाने वृद्धेचा मृत्यू
बोदवड, जि.जळगाव : तालुक्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्ण वाढतच असून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २५१ झाली आहे, तर कोरोनामुळे उपचार दरम्यान बळीची संख्या १० झाली आहे यात एकट्या बोदवड शहरात सहा बळी तर कोल्हाडी, शेलवड, वरखेड, नाडगाव येथे प्रत्येकी एक बळी गेला आहे.
शहरातील स्टेशन रोडवरील एक प्रसिद्ध व्यापारी तसेच आजी ग्रामपंचायत सदस्य असलेले व्यापाऱ्याच्या आईचे जळगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून, त्यांचे संपूर्ण घर क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर मृतकाच्या संपर्कातील एक ४० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली आहे.
दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मात्र नागरिकांनी काट्यावर अंग टाकल्यासारखे वागत असून तोंडावर मास्क तसेच गर्दी टाळली जात नाही.