कोरोनामुळे चीनच्या वस्तू नको रे बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 04:12 PM2020-10-12T16:12:44+5:302020-10-12T16:14:42+5:30
कोरोनाच्या भीतीमुळे ‘चीनच्या वस्तू नको रे बाप्पा...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
लियाकत सय्यद
जामनेर : दिवाळी आली की बच्चे कंपनीला ओढ लागते ती फटाकेची, रोषणाई, आकाश कंदील, दिवे, तोरणे याची. कोरोनामुळे चीनमधून येणाऱ्या मालाची आयात थांबल्याने चायना मेड वस्तू बाजारात कमी प्रमाणात दिसत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ‘चीनच्या वस्तू नको रे बाप्पा...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
ज्यांच्याकडे गेल्या वर्षाचा चायना मेड वस्तूंचा साठा उपलब्ध आहे, ते व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना माल पुरवित असल्याची माहिती आहे. कोरोनाच्या भीतीमुळे चीनच्या वस्तू नको रे बाप्पा असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. परिणामी बहुतेक व्यापाऱ्यांकडे स्थानिक उत्पादकांनी तयार केलेल्या दिवे ,आकाश दीप, रोषणाई, तोरण मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
तसेच मागील वर्षीय तुलनेत या वर्षी दिवाळीवर कोरोनासोबत मंदीची लाट आहे. कारण जे लोक पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर आदी भागात नोकरीनिमित्त किंवा कामानिमित्त जायचे ते दरवर्षी दिवाळी सणासाठी घरी परत यायचे त्यामुळे खरेदीत तेजी राहत होती. मात्र यंदा हे सगळे कोरोनामुळे घरीच असल्याने याचा परिणाम दिवाळी व्यवसायावर होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
ज्या मोठ्या व्यापाºयांकडे गेल्या वर्षीचा माल आहे ते विक्री करीत आहे. तसेच लोकांमध्ये आता जागृती झाल्याने स्थानिक वस्तूंची मागणी वाढली आहे.
-राजेश कोठारी, व्यावसायिक, जामनेर
यंदा कोरोना व आॅनलाईनमुळे व्यवसायवर संकट आले आहे. कंपन्या छोटे-मोठे व्यावसायिक यांना फटका बसणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी पूर्ण अंधारात जाण्याची शक्यता आहे.
- हुसेन मास्टर, मोबाईल विक्रेते, जामनेर