मुक्ताईनगर तालुक्याच्या दाराशी कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 03:40 PM2020-04-26T15:40:34+5:302020-04-26T15:40:40+5:30

कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील मान्यरखेडा येथील १४ जण जळगाव रवाना

Corona at the door of Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्याच्या दाराशी कोरोना

मुक्ताईनगर तालुक्याच्या दाराशी कोरोना

googlenewsNext


मुक्ताईनगर : जळगाव येथे उपचारासाठी गेलेली मलकापूर जि. बुलढाणा येथील ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये ही महिला मन्यारखेडा ता.मुक्ताईनगर येथे नातेवाईकांकडे ३ दिवस वास्तव्यस राहिल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या महिलेच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना तातडीने जळगाव हलविण्यात आले आहे. पूर्ण मन्यारखेडा गाव व रुईखेडा परिसर बंद करण्यात आले असून बाहेरच्या व्यक्तींना गावबंदी करण्यात आली आहे. या घटने मुळे खळबळ उडाली असून प्रशासन सतर्क झाले आहे. एकूण स्थिती पाहता मुक्ताईनगर तालुक्याच्या दाराशी कोरोना आल्याची भीती निर्माण झाली आहे.
मलकापूर येथील या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर पक्षघाताच्या आजाराबाबत जळगाव येथे उपचार सुरू होते. त्यासाठी सदर महिला १० ते १४ एप्रिल दरम्यान मान्यरखेडा येथे मुक्कामी होती परत २० रोजी मान्यरखेडा येथील भाच्याच्या कारने ही महिला जळगाव येथे उपचारासाठी गेली होती. २१ रोजी तिचे कोविड १९ साठी नमुने घेण्यात आले असता शनिवारी ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान सकाळ पासून आरोग्य, महसूल व पोलीस विभागाची धावपळ मान्यरखेडा येथे सुरू झाली. महिलेच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना तीन रुग्णवाहिकेतून सोशल डिस्टनसिंग राखत जळगाव येथे तपासणी साठी रवाना करण्यात आले आहे.
घरोघरी सर्वेक्षण सुरु
अवघे ४० कुटुंब संख्या आणि २०० लोकवस्ती असलेल्या हे गाव कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये आल्याने आरोग्य विभागाने पूर्ण गाव निजंर्तुकीकरण केले घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. लगतच्या रुईखेडा आणि कण्यारखेडा या गावांमध्ये देखील सक्ती करण्यात आली असून नागरिकांनी स्वत:हून गावबंदी घोषित केली आहे. तहसीलदार श्याम वाडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी मान्यरखेडा गाठत उपाय योजना सुरू केल्या आहेत
 

Web Title: Corona at the door of Muktainagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.