कोरोना महामारी सेवा बजावणाऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:32 AM2020-12-15T04:32:16+5:302020-12-15T04:32:16+5:30
फोटो आहे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना महामारीत सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी ...
फोटो आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना महामारीत सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र समविचारी मंचच्याव तीने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
कोरोनाने उच्छाद मांडल्यानंतर त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी राज्यात परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार यांसह अन्य तांत्रिक कर्मचाऱ्यांची हंगामी स्वरूपात भरती करण्यात आली होती. आता या कर्मचाऱ्यांना गरज संपल्यावर कामावरून कमी करण्यात आले आहे, असा आरोप महाराष्ट्र समविचारी मंचतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत कायम करण्यात यावे अन्यथा पुन्हा ११ महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. सोमवारी लाक्षणिक उपोषण केल्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. त्वरित कार्यवाही न झाल्यास येत्या काळात मोठे आंदोलन केले जाईल, असाही इशारा देण्यात आला आहे.
लाक्षणिक उपोषणात यांचा होता सहभाग
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणात डॉ. विद्या कांबळे, राहुल चौधरी, अशोक गायकवाड, डॉ.आरिफ शेख, चित्रा बडगुजर, माधुरी मोरे, कोमल मोरे, सुनील देवरे, कांचन पडाळे आदींचा सहभाग होता.