कोरोनापाठोपाठ डेंग्यूचा ताप, उटखेड्यात आढळले रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 06:40 PM2021-02-14T18:40:37+5:302021-02-14T18:40:43+5:30
गावात घबराट, आरोग्य विभागाने हाती घेतली तपासणी मोहीम
उटखेडा, ता. रावेर : येथे डेंग्यू सद्श्य रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .
डासांच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या डेंग्यूमुळे उटखेडेकरांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. नऊ दिवसांपूर्वी प्रथम एका दहा वर्षाच्या मुलाला डेंग्यू हा आजार आढळल्याने त्याचा उपचार रावेर येथील करण्यात आला. यानंतर त्याच परिसरात चार दिवसांपूर्वी एका आठ वर्षीय मुलालासुध्दा डेंग्यू झाला असून रावेर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आढळल्या डेंग्यूच्या अळ्या
डेंग्यूचे रुग्ण सापडत असल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या पथकाने गावात मोहीम राबविली. या मोहिमेत कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. त्या वेळी आठ ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असून पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या. कोरोनानंतर डेंग्यूचा शिरकाव झाल्याने आरोग्य उपकेंद्र सतर्क झाला आहे. ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन उपकेंद्राचे डॉ. कैलास सरोदे यांनी केले आहे. जास्त दिवस पाणी संग्रही ठेवू नये, घर व परिसर स्वच्छ ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या. पाणी उकळून व स्वच्छ करून प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, असे आवाहन केले. यावेळी विजय नेमाडे (मलेरिया सुपरवायझर), सुभाष ठाकूर, बी.ए. तडवी, रुखया तडवी, सिंधूबाई पाटील, शबनम तडवी आदी उपस्थित होते.