महापालिका हद्दीत कोरोना वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:16 AM2021-02-12T04:16:20+5:302021-02-12T04:16:20+5:30

जळगाव : शहरात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना वाढत असल्याचे गंभीर चित्र असताना गुरुवारी शासकीय आकडेवारीनुसार २२ जण पॉझिटिव्ह आढळून ...

Corona grew within the municipal boundaries | महापालिका हद्दीत कोरोना वाढला

महापालिका हद्दीत कोरोना वाढला

Next

जळगाव : शहरात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना वाढत असल्याचे गंभीर चित्र असताना गुरुवारी शासकीय आकडेवारीनुसार २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. आरटीपीसीआर आणि ॲन्टिजन असे एकत्रित शहरात २९ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात ४० ॲन्टिजन चाचण्यांमध्ये १९ जण बाधित आढळून आले आहेत. यामुळे शहरात कोरोना वाढत असून, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाचे सलग तिसऱ्या दिवशी दोन मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढली आहे. जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांच्या खाली ९६.९८ टक्क्यांवर आले आहे. शहरात गेल्या चार दिवसांमध्ये पन्नासपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. विविध भागात हे रुग्ण समोर येत आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने रुग्णसंख्या वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शहरात नियमांची पुन्हा पायमल्ली होत असून, नियम पाळले जात नसल्यानेही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शिवाय रुग्ण समोर येत नसल्यानेही चिंता व्यक्त केली जात आहे. अधिक रुग्ण समोर आल्यास आणखी संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. शहरात महापालिका हद्दीत तपासणी झालेल्यांपैकी आरटीपीसीआरमधून १७ रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील २९ रुग्णांमध्ये २२ रुग्ण हे जळगावातील असल्याची माहिती शासनाने पत्रकात दिली आहे. बोदवड ६७, आणि भुसावळ ८९ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

या भागात रुग्ण

खोटेनगर, हरिविठ्ठलनगर, रायसोनी नगर या भागात प्रत्येकी तीन, बळीरामपेठ, मासूमवाडी, भिकमचंद जैन नगर, अर्जुननगर या भागात प्रत्येकी दोन, तर शिवकॉलनी, जीवननगर, मुक्ताईनगर, तिलकनगर, अजिंठा चौफुली, निवृत्तीनगर, सेंट्रल बँक कॉलनी, वाघनगर, सरस्वतीनगर, प्रेमनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

कोट

खासगी रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्यांची डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, लक्षणे जाणवणाऱ्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कोराेना चाचणी करून घ्यावी, लसीकरणासोबतच आता रुग्णांची ओळख पटणे अधिक महत्त्वाचे असून, यामुळे आपण पुढील संसर्ग टाळू शकणार आहोत. -डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी मनपा

Web Title: Corona grew within the municipal boundaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.