कोरोना वाढतोय...नागरिक मात्र बिनधास्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:15 AM2021-03-07T04:15:34+5:302021-03-07T04:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर तीन नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार होत असताना सोशल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर तीन नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार होत असताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे गंभीर चित्र अनेक ठिकाणी कायम असून कोरोना रोखणे हे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर आले आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाची संख्या ही थेट साडे सातशेच्या घरात पोहचल्याने चिंतेत भर पडली आहे. काही प्रमाणात प्रशासनाने निर्बंध टाकले आहेत. मात्र, गर्दीवर नियंत्रण मिळविणे आताही अशक्य असल्याचे चित्र कायम आहे. विवाह सोहळ्यांवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. मात्र, बाजारपेठा, दुकाने, शासकीय कार्यालय, अशा अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, विना मास्क फिरणाऱ्यांची वाढणारी संख्या या बाबी सर्रास निदर्शनास येत असून नागरिकांनी आतातरी नियम पाळावेत, अन्यथा कोरोनाचा उद्रेक होईल, असेही तज्ञांकडून सांगितले जात आहे.