ग्रामीण भागात कोरोना वाढतोय, तपासण्यांची संख्या कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:15 AM2021-05-10T04:15:13+5:302021-05-10T04:15:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातही रुग्ण वाढ समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातही रुग्ण वाढ समोर येत आहे. अनेक दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असताना चाचण्यांची संख्या मात्र, या भागात शहराच्या तुलनेत कमी असल्याचे चित्र आहे. सरासरी तीनशे ते चारशे चाचण्या ग्रामीण भागात रोज होत आहेत. मात्र, यात बाधितांचे प्रमाण बघता ते अधिक असून चाचण्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये बाधितांची संख्या ही ५१०७ वर पोहोचली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक असले तरी नियमित आढळून येणाऱ्या बाधितांचे प्रमाण चिंताजनक आहे. शिवाय मृत्यूमध्येही वाढ होताना दिसत आहे.
जिल्ह्यातील एकूण रुग्ण- १२९०४९
जळगाव शहरातील रुग्ण- ३१५६९
जळगाव ग्रामीणमधील रुग्ण- ५१०७
गृहविलगीकरणातील रुग्ण- ६४६०
१ एप्रिल
जळगाव शहर बाधित : १०१
जळगाव ग्रामीण बाधित : १४
१० एप्रिल :
जळगाव शहर- २८७
जळगाव ग्रामीण- ९३
२० एप्रिल
जळगाव शहर- १८२
जळगाव ग्रामीण- २६
३० एप्रिल
जळगाव शहर- १४१
जळगाव ग्रामीण- २०
८ मे
जळगाव शहर १३३
जळगाव ग्रामीण ६२
आठवडाभरात वाढले ३०० रुग्ण
ग्रामीण भागात गेल्या आठवडाभरात ३०० रुग्णांची भर पडली आहे. सरासरी रोज ४५ रुग्ण आढळून येत असल्याने ग्रामीण भागातही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र या आठवड्यात कायम आहे. जळगाव तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांमार्फत कोरोना तपासणी केल्या जात असून त्यातूनही बाधितांची संख्या समोर येत असते.
ग्रामीण भागात लसीकरणाला मर्यादा
जळगाव ग्रामीणमध्ये विविध आरोग्य केंद्रांवर होणाऱ्या लसीकरणाला लसीचे मुबलक डोस उपलब्ध होत नसल्याने मर्यादा आहेत. त्यामानाने शहरात अधिक प्रमाणात लसीकरण होत आहे. त्यात आता १८ ते ४५ वयोगटाच्या लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी होत असल्याने आरोग्य यंत्रणेपुढे हे मोठे आवाहन आहे.
असे झाले लसीकरण
आरोग्य कर्मचारी पहिला डोस : २४५०१, दुसरा डोस : १३६२४
फ्रंटलाईन वर्कर पहिला डोस : ३०९०७, दुसरा डोस : १०७५३
४५ वर्षांवरील नागरिक : पहिला डोस : २०९१७५, दुसरा डोस : ३७२४४
१८ ते ४४ वर्षांवरील नागरिक : पहिला डोस ६६८५
ग्रामीण भागातही चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. शिवाय, लसीकरण केंद्रही वाढविण्यात आले असून लस उपलब्ध झाल्यानुसार लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक