कोरोनामुळे भुसावळातील ‘रेल नील’ प्रकल्पातील भरती प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:23 AM2021-06-16T04:23:59+5:302021-06-16T04:23:59+5:30

जळगाव : भुसावळला आयआरसीटीसीमार्फत ‘रेल नील’ प्रकल्प उभारण्यात आला असून, या प्रकल्पासाठी आयआरसीटीसीतर्फे यंदा मे महिन्यात भरती प्रक्रिया राबवून, ...

The corona hampered the recruitment process at the Rail Neel project in Bhusawal | कोरोनामुळे भुसावळातील ‘रेल नील’ प्रकल्पातील भरती प्रक्रिया रखडली

कोरोनामुळे भुसावळातील ‘रेल नील’ प्रकल्पातील भरती प्रक्रिया रखडली

Next

जळगाव : भुसावळला आयआरसीटीसीमार्फत ‘रेल नील’ प्रकल्प उभारण्यात आला असून, या प्रकल्पासाठी आयआरसीटीसीतर्फे यंदा मे महिन्यात भरती प्रक्रिया राबवून, जूनमध्ये या प्रकल्पाचे रेल्वे मंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन करण्याचे नियोजन होते. मात्र, मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. परिणामी यामुळे प्रकल्पाचा उद्घाटनाचा मुहूर्तही लांबणीवर पडला आहे.

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) मार्फत भुसावळला गेल्या दीड वर्षांपासून रेल्वे नीर प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या हे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. भुसा‌वळातील एमआयडीसीत हा प्रकल्प उभारला जात आहे. हैदराबाद येथील हायमॅक्स कंपनीतर्फे या प्रकल्पासाठी लागणाऱ्या मशिनरींची उभारणी करण्यात येत आहे. ८ हजार ५५० चौरस मीटरमध्ये हा प्रकल्प उभारला जात असून, यासाठी ८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या प्रकल्पात तीन पाळीत कर्मचारी काम करणार असून, २४ तासात ७२ हजार पाण्याच्या सीलबंद बाटल्या तयार होणार आहेत. ही पाण्याची बॉटल भुसावळ विभागातील सर्व स्टेशनवर १५ रुपये किमतीला विक्री करण्यात येणार आहे. यामुळे स्टेशनवरील इतर कंपन्यांच्या पाण्याच्या बॉटल विक्रीला बंदी घालण्यात येणार आहे.

इन्फो :

कोरोनामुळे उद्घाटनाचा मुहूर्त हुकला

भुसावळ एमआयडीसीत उभारण्यात आलेला आयआरसीटीचा ‘रेल नील’चा प्रकल्प हा महाराष्ट्रातील तिसरा प्रकल्प आहे. सध्या राज्यात नागपूर व अंबरनाथ येथे हा प्रकल्प सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले काम फेब्रुवारीत पूर्ण झाले. फक्त काही तांत्रिक काम अपूर्ण आहे. या प्रकल्पात लागणाऱ्या मनुष्य बळासाठी आयआरसीटीसीतर्फे मे महिन्यात साधारणत : १०० ते १२५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती आणि त्यांनतर जूनमध्ये रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार होते. मात्र, कोरोनामुळे आयआरटीसीतर्फे ही सर्व प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे जूनमधील उद्घाटनाचा मुहूर्त हुकला आहे. मात्र, ही भरती प्रक्रिया आता कधी होणार याबाबत आयआरसीटीसीतर्फे याबाबत कुठलीही माहिती देण्यात आली नाही.

Web Title: The corona hampered the recruitment process at the Rail Neel project in Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.