शहरात गेल्या पाच महिन्यांचा कोरोना उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:57+5:302021-03-15T04:15:57+5:30

जळगाव : शहरात रविवारी पाच महिन्यांच्या कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदविण्यात आला. ३७६ नवे रुग्ण समोर आले असून तीन बाधितांच्या ...

Corona highs in the last five months in the city | शहरात गेल्या पाच महिन्यांचा कोरोना उच्चांक

शहरात गेल्या पाच महिन्यांचा कोरोना उच्चांक

Next

जळगाव : शहरात रविवारी पाच महिन्यांच्या कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदविण्यात आला. ३७६ नवे रुग्ण समोर आले असून तीन बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आधी ५ ऑक्टोबर रोजी ३६९ रुग्णांची एका दिवसात नोंद करण्यात आली होती. शहरातील बाधितांचे प्रमाण हे थेट ४० टक्क्यांपर्यंत पोहचल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे.

जळगाव शहरात गेले पाच दिवस सलग ३०० पेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. या मृत्यूची संख्याही वाढत असून रविवारी ६५, ८५ वर्षीय पुरूष, ७० वर्षीय महिला यांचा मृत्यू झाला. यासह चोपडा तालुक्यातील ८० वर्षीय महिला, भुसावळ तालुक्यातील ५३ वर्षीय पुरूष, चाळीसगाव तालुक्यातील ७८ वर्षीय पुरूष यांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १४४४ रुग्णांचा मृत्यू झाला असून यात शहरातील ३२८ रुग्णांचा समावेश आहे.

अशा झाल्या चाचण्या

रविवारी ९२१ आरटीपीसीआर चाचण्या घेण्यात आल्या तर ४३२४ ॲन्टीजन चाचण्या झाल्या. ॲन्टीजन चाचण्यांमध्ये ७११ बाधित रुग्ण समोर आले आहेत. तर आरटीपसीआरचे ७६९ अहवाल आलेत त्यात २६८ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉलिटेकनीकच्या केंद्रावर दोन ठिकाणी चाचण्या होत आहेत. यात एका केंद्रावर १९२ तपासण्यांमध्ये तब्बल ११ जण बाधित आढळून आले होते. हे प्रमाण तब्बल ५७ टक्क्यांवर पोहोचले असून शहरात मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढल्याचे हे चित्र आहे.

असे आहेत रुग्ण

कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्ण : ९१०

डीसीएचसी मध्ये उपचार घेत असलेले रुग्ण : ९६६

डीसीएचमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण १३१०

होम आयसोलेशनमधील रुग्ण : ५०७८

ऑक्सिजन पुरवठा करावा लागणारे रुग्ण : २९७

आयसीयूमधील रुग्ण : २४०

मुक्ताईनगरात विस्फोट

शहरातील मुक्ताईनगर भागात कोरोनाचा विस्फोट झाला असून एका दिवसात १२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासह वाघनगरात ९ नवे रुग्ण समोर आले आहेत. शहरातील प्रत्येक भागात एक किंवा दोन रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाने संपूर्ण शहराला व्यापले असल्याचे गंभीर चित्र आहे.

Web Title: Corona highs in the last five months in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.