कोरोनामुळे केळीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:12 AM2021-04-29T04:12:15+5:302021-04-29T04:12:15+5:30

१४०० रुपये बोर्ड असताना ८०० रुपयांमध्ये खरेदी : निर्यात घटली लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना ...

Corona hits the banana | कोरोनामुळे केळीला फटका

कोरोनामुळे केळीला फटका

Next

१४०० रुपये बोर्ड असताना ८०० रुपयांमध्ये खरेदी : निर्यात घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, ही संख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, केळीच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. रावेर व जळगाव बोर्ड भावाप्रमाणे केळीचे दर १४०० रुपयांपर्यंत असले तरी मागणी घटल्याने व्यापारी केवळ ८०० रुपये प्रति क्विंटल या दराने मालाची उचल करत आहेत.

राज्यासह देशभरातील बाजारपेठा आता बंद झाल्या आहेत. यामुळे केळीची मागणी घटली आहे. जळगाव जिल्ह्यातून जम्मू काश्मीर, दिल्ली , राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जात असते. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निर्यातीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातून सद्यस्थितीत नवती मृग बागाची काढणी सुरू आहे. या हंगामात दररोज जिल्ह्यातून सुमारे २ हजार टन मालाची निर्यात केली जात असते. मात्र यंदा काही प्रमाणात घट झालेली पहावयास मिळत आहे. त्यातच व्यापारी देखील माल काढण्यासाठी शेतकऱ्यांकडे वेळेवर जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल शेतातच पडून आहे. तर अनेक शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. केळीचे दर जरी १२०० ते १८०० पर्यंत असले तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मात्र ६०० ते ८०० रुपये इतका दर मिळत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी देखील जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. यावर्षीही केळी उत्पादक शेतकऱ्यांसमोर कोरोनाचे मोठे संकट उभे राहिले आहे.

Web Title: Corona hits the banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.