अमळनेरच्या मृत महिलेसह पतीला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:18 PM2020-04-21T23:18:29+5:302020-04-21T23:19:10+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा बळी

Corona to husband with Amalner's dead wife | अमळनेरच्या मृत महिलेसह पतीला कोरोना

अमळनेरच्या मृत महिलेसह पतीला कोरोना

Next

जळगाव : अमळनेर येथील ५२ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेसह तिच्या पतीलाही कोरोना असल्याचा अहवाल मंगळवारी रात्री कोरोना रुग्णालयाला प्राप्त झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. पतीला कोरोना वॉर्ड १ मध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोघांना रविवारी कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात सोमवारी महिलेचा मृत्यू झाला होता. यातील पुरुषाचे वय ६० वर्ष असून त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांची ‘हिस्ट्री’ घेण्यासह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली.
कोरोनामुळे दुसरा मृत्यू
कोरोनाने जिल्ह्यात दुसरा बळी घेतला आहे. या आधी जळगावातील सालार नगरातील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. आता ५२ वर्षीय महिलेचाही कोरोनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आता अधिक जबाबदारीने लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे व घरातच रहावे, कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

१४ वर्षाच्या मुलांसह तिघा संशयितांचा मृत्यू
कोरोना रुग्णालयात सोमवारी दाखल १४ वर्षांच्या मुलासह तिघा संशयितांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. यातील ५५ वर्षाच्या पुरुषाला मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते.
कोरोना रुग्णालयात सोमवारी एक १४ वर्षाचा मुलगा, ७३ वर्षीय वृद्ध यांना गंभीर अवस्थेत अति दक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. यातील वृद्धाला अनेक दिवसांपासून क्षयरोग होता तर १४ वर्षीय मुलाला मधुमेह होता. यासह ५५ वर्षीय पुरुषाला मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. त्यांना हार्नियाची लागन असल्याचे समोर आले आहे. तिघांचे नमुने घेऊन धुळे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत त्यांचे तपासनी अहवाल येण्याची शक्यता आहे.
अन्य मृतांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मंगळवारी कोरोना रुग्णालयात ओपीडीत १२३ जणांची तपासणी करण्यात आली. यातून १०४ जणांना घरी सोडण्यात आले. त्यातील १९ जणांना दाखल करण्यात आले आहे. या पैकी १६ जणांचे नमुने घेऊन धुळे येथे पाठविण्यात आले आहे.
अकरा जणांचे नमुने घेतले
अमळनेर येथील बाधित महिलेच्या संपर्कातील २० जणांपैकी ११ जणांचे नमुने मंगळवारी घेण्यात आले असून उर्वरित ९ जणांचे बुधवारी नमुने घेण्यात येणार आहे़ यासह दहिगावच्या १८ जणांपैकी ११ जणांना घरी सोडले असून उर्वरित ८ जणांचेही बुधवारी नमुने घेतले जाणार आहेत़ त्यांना शाहु महाराज रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे़

Web Title: Corona to husband with Amalner's dead wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.