कोरोनाचा संसर्ग थांबेना ! पुन्हा ५० रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 08:01 PM2020-06-05T20:01:59+5:302020-06-05T20:02:12+5:30
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यातही कोरोना विषाणून अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली ...
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यातही कोरोना विषाणून अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली असून शुक्रवारी जिल्ह्यात तब्बल ५० व्यक्तींचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ०१, भुसावळ ०४, चोपडा ०३, पाचोरा ०७, भडगाव ०१, धरणगाव ०१, यावल ०६, एरंडोल ०१ तसेच जामनेर ०३, जळगाव ग्रामीण ०१, रावेर १७, चाळीसगाव ०४ व मुक्ताईनगर ०१ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ९५७ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण भुसावळात आढळून आले आहे. २०९ अशी ती संख्या आहे. त्यापाठोपाठ जळगाव शहरमध्ये आतापर्यंत २०६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेले आहेत.