१९ पैकी १२ प्रभागांमध्ये कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 12:24 PM2020-05-13T12:24:42+5:302020-05-13T12:25:11+5:30

जळगाव : शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील एकूण१९ प्रभागांपैकी १२ प्रभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे शहराची ...

 Corona infiltration in 12 of the 19 wards | १९ पैकी १२ प्रभागांमध्ये कोरोनाचा शिरकाव

१९ पैकी १२ प्रभागांमध्ये कोरोनाचा शिरकाव

Next

जळगाव : शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शहरातील एकूण१९ प्रभागांपैकी १२ प्रभागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे शहराची स्थिती आता हॉटस्पॉटकडे जात आहे. शहराच्या चारही बाजूने कोरोनाचा विळखा वाढत असल्याने मनपा व जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर आतापर्यंत कोणतीही घट सध्यातरी दिसून येत नाही. बुधवारीदेखील शहरात मेहरूण, श्रीधर नगर, शांतीनगर, श्रीरामनगर भागात पाच रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या ३३वर पोहचली आहे.
जळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून २८ मार्च ते २६ एप्रिलपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या शुन्यावर आली असताना अचानक २७ एप्रिलनंतर परिस्थितीत झालेल्या बदलामुळे ही संख्या आता ३३ वर पोहचली आहे. या स्थितीला प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाप्रमाणे लॉकडाऊनचा नियम मोडणारे नागरिक देखील जबाबदार आहेत. शहरातील १९ पैकी १२ प्रभागांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून, काही प्रभागांमध्ये रुग्णसंख्या ही एकपेक्षा अधिक आहे. प्रशासन उपाययोजना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर नागरिकांनीच आता स्वयंशिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे.
शहरात एकूण १३ प्रतिबंधीत क्षेत्र असून, या भागांमध्ये दिवसाला २ वेळा फवारणी करण्याचा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. यासह या क्षेत्रात ४७ हजार नागरिकांची १४ दिवस सर्वेक्षण करून, या नागरिकांकडून लक्षणाची माहिती घेतली जाणार आहे.

ओंकारनगर, प्रतापनगर सील...
सोमवारी ओंकार नगर, प्रताप नगरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर मनपाच्या पथकाने सायंकाळीच संपुर्ण परिसर सील केला. त्यानंतर या भागातून प्रत्येकी १२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले असून, या परिसरातील संपुर्ण व्यवहार बंद करून, नागरिकांना घरातून बाहेर न येण्याचे आवाहन मनपा कर्मचाऱ्यांनी केली. तसेच मंगळवारी सकाळी ९ वाजेपासून मनपा वैद्यकीय विभागाचे पथक व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

रुग्ण आढळलेल्या भागात रात्रीतच उपाययोजना
श्रीधर नगरमध्ये कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास मनपाच्या पथकाने संपूर्ण परिसर सील केल्यानंतर १४ जणांना क्वॉरंटाईन केले. तर मेहरूण भागातूनही १८ जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या भागातील रुग्णांची स्थिती रात्री ८ वाजता जाहीर करण्याआधीच मनपा व पोलीस प्रशासनाने श्रीधर भाग दुपारीच सील करून घेतला होता. कोरोनाचा रुग्ण जाहीर होण्याआधीच परिसर सील होत असल्याने भितीचे वातावरण पसरले होते. तसेच शांतीनगर, श्रीराम नगर या भागातदेखील उपाययोजना हाती घेतल्या.

Web Title:  Corona infiltration in 12 of the 19 wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.