चार नवीन परिसरात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:37 PM2020-05-11T12:37:13+5:302020-05-11T12:37:23+5:30

चिंता वाढली : एकाच दिवसात सहा नवीन रुग्ण, एकूण ५२ जण क्वारंटाईन, उपाययोजना सुरू

Corona infiltration into four new areas | चार नवीन परिसरात कोरोनाचा शिरकाव

चार नवीन परिसरात कोरोनाचा शिरकाव

Next

जळगाव : शहरात रविवारी एकाच दिवसात ६ रुग्णांचे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून यात चार रुग्ण हे नवीन परिसरातील असल्याने चिंता वाढली आहे़ शहरातील सिंधी कॉलनी, शाहूनगर, खंडेराव नगर, निमखेडी रोड वरील हायवेदर्शन कॉलनी यासह पवननगरातील संपर्काती दोन असे सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत़ शहरातील रुग्ण संख्या २२ वर पोहचली आहे़ दरम्यान, नवीन आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील अति जोखीमीच्या संपर्कातील ५८ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे़ चार दिवसात विविध भागात रुग्ण आढळून येत आहेत़ रुग्णंची हिस्ट्री काढण्याचे मोठे आव्हान समोर आहे़ दरम्यान, सिंधी कॉलनीतील रुग्ण एका खासगी डॉक्टरांकडेपण तपासणीसाठी त्या दृष्टीनेही माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे समजते़ रुग्ण आढळताच महापालिकेचे वैद्यकीय पथक तत्काळ त्या ठिकाणी पोहचून उपाययोजना सुरूवात करण्यात आली होती़ दरम्यान, रुग्ण आढळून आलेल्या परिसरात पूर्ण सर्व्हेक्षण सुरू असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ राम रावलाणी यांनी दिली़

४७ हजार लोकांची तपासणी
ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत़ अशा सर्व भागात जम्बो सर्व्हेक्षण सुरू आहे़ त्यात एकूण सर्व भागातील ४७ हजार २४१ जणांची तपासणी करण्यात येणार आहे़ यात बाधित परिसरातील एकूण अतिजोखीमीचे संपर्क २०९ असून कमी जोखीमीचे संपर्क ७८१ आहेत़ यातील अनेकांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत़ या सर्व परिसरात उपाययोजना राबविल्या जात आहेत़

शहरात १४ प्रतिबंधित क्षेत्र
शहरात रोज नवीन परिसरात रुग्ण आढळून येत असल्यामुळे सद्य स्थितीत १४ प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन) ठरविण्यात आले आहे़ ज्या परिसरात रुग्ण आढळून येतो़ त्या परिसराचा भाग कंटेमेंट झोन ठरविण्यात येत असतो़ यानुसार हे सर्व परिसर चारही बाजुनी सील करण्यात आले आहे़ यात चौदा दिवस महापालिकेच्या वैद्यकय पथकाकडून संपूर्ण सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे़ एकाच दिवसात चार प्रतिबंधीत क्षेत्र ठरवून ते सील करण्यात आले आहे़

Web Title: Corona infiltration into four new areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.