हॉकर्स, वाहनधारक, भाजी विक्रेत्यांची उद्यापासून कोरोना तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:14 AM2020-12-08T04:14:00+5:302020-12-08T04:14:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना आल्यानंतर अखेर जिल्हाभरात कोरोना चाचण्या वाढविण्याचे नियोजन प्रशासनाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना आल्यानंतर अखेर जिल्हाभरात कोरोना चाचण्या वाढविण्याचे नियोजन प्रशासनाने हाती घेतले असून यात भाजी विक्रेते, हॉकर्स, वाहनधारक अशा अधिक लोकांच्या संपर्कात येणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
ॲन्टीजनपेक्षा आरटीपीसीआरचे प्रमाण हे अधिक असावे, ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के ॲन्टीजन या प्रमाणात कोरोना चाचण्या व्हायला हव्यात असे शासनाचे आदेश आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, बाधितांचे प्रमाणच कमी असल्याने चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, आता प्रत्येक तालुक्यातून किमान दीडशे चाचण्या करायचे नियोजन असून दिवसभरात तीन ते चार हजार चाचण्यांचे टर्गेट प्रशासनासमोर असेल. दरम्यान, चाचण्या वाढविण्याबाबत नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिले आहे.
महापालिकेसमोर पेच
शहरात एका दिवसात १८०० चचण्या करायचा असून यात ६५ टक्के आरटीपीसीआर असाव्यात असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभगासमोर हो मोठा पेच निर्माण झाला आहे. पीक पिरिएडमध्ये ही जास्तीत जास्त ७५० एका दिवसाला होत होत्या. तेव्हा आता १८०० चाचण्या कशा होणार, शिवाय तेवढे मणुष्यबळ आहे का असे अनेक प्रश्न आता महापालिकसमोर उभे ठाकले आहेत.
दोन दिवसात नॉन कोविडबाबत पाहणी
नॉन कोविडची सुविधा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत दोन दिवसात कोविड रुग्णालयाची पाहणी करणार आहे. किमान २०० बेडचे जे मुख्य रूग्णालय आहे त्या ठिकाणी ही सुविधा सुरू करावी, असे नियोजन आहे. मात्र, केवळ कक्ष स्वच्छ करून चालणार नाही तर डॉक्टर कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे. याबाबत आपले अधिष्ठातांशी बोलणे झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजत राऊत यांनी लोकमतला दिली