महिनाभरात कोरोनामुळे विद्यापीठातील पाच कर्मचा-यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:16 AM2021-04-27T04:16:26+5:302021-04-27T04:16:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पाच कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी, विद्यापीठावर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पाच कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परिणामी, विद्यापीठावर दु:खाचे डोंगर पसरले असून आता काही कर्मचारी देखील या भयावह परिस्थितीमुळे विद्यापीठात येण्यास नकार देत आहेत.
दोन महिन्यात कोरोना विषाणूचा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला. बाधितांची संख्या तर वाढली. पण, मृत्यूचे प्रमाणही वाढले. कोरोनाच्या या दुस-या लाटेत कोरोनाच्या मृत्यू सोबत नैसर्गिक मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. महिन्याभरात विद्यापीठातील पाच कर्मचा-यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पन्नास ते साठ कर्मचारी हे कोरोना बाधित आढळून आले आहे. दरम्यान, कोरोनाच्या या भयावह परिस्थितीमुळे आता पंधरा टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश विद्यापीठाने काढले आहे.
यांचा झाला मृत्यू
महिन्याभरामध्ये ज्ञानेश्वर बागुल (शिपाई), निळकंठ अहिरराव (कक्ष अधिकारी), नरेंद्र सोनवणे (सहाय्यक), रमेश शिंदे (मुद्रीत शोधक) व व्ही.एफ.पाटील (सिलेज प्रकल्प) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.