कोरोना बाधित ५५ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:31 AM2020-12-13T04:31:31+5:302020-12-13T04:31:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे ४८ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्येने ५५ हजारांचा टप्पा ओलांडला असून ...

Corona obstructed 55 thousand crosses | कोरोना बाधित ५५ हजार पार

कोरोना बाधित ५५ हजार पार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचे ४८ नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्येने ५५ हजारांचा टप्पा ओलांडला असून रुग्णसंख्या ५५ हजार ५५ वर पोहोचली आहे. शनिवारी एका बाधिताचा मृत्यू झाला. जळगाव शहर व मुक्ताईनगरात प्रत्येकी १ रुग्णांची नोंद करण्यात आली. शनिवारी जिल्हाभरात २३४० चाचण्यांचे अहवाल आले. यात १६७९ ॲन्टीजन तर ६६१ आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. ४९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. भुसावळ येथील ५६ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या भागात आढळले रुग्ण

भोईटे नगर २, गणेश नगर, प्रेमनगर, गणपतीनगर, शंकरअप्पा नगर या भागात प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळून आला आहे.

दोन दिवसांनी फुले मार्केटमध्ये तपासणी

गेल्या तीन दिवसांपासून दाणाबाजारात व्यापारी, कामगारांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून येत्या दोन दिवसात फुले मार्केटमध्ये व्यापारी, कामागारांची तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Corona obstructed 55 thousand crosses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.