कोरोनामुळे डोळे उघडले; रूग्णालये वाढली, सुविधाही वाढल्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:23+5:302021-06-30T04:11:23+5:30
स्टार ८६४ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना आधी अगदीच खिळखिळी असलेल्या आरोग्य यंत्रणेत कोरेानानंतर अमुलाग्र बदल झाले आहेत. ...
स्टार ८६४
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना आधी अगदीच खिळखिळी असलेल्या आरोग्य यंत्रणेत कोरेानानंतर अमुलाग्र बदल झाले आहेत. यात अगदी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची भर पडली आहे. शिवाय व्हेंटीलेटरची संख्या २०० वर पोहोचली आहे. या सर्व सुविधा कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात उपयोगात येणार आहेत. भविष्यात सर्वांनाच याचा फायदा होणार आहे.
जिल्ह्यात २०२०च्या मार्च महिन्यात कोरोनाने धडक दिली होती. त्यानंतर केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातच या कक्षांची व्यवस्था होती. त्यानंतर पूर्ण रुग्णालय कोविड रुग्णालय घोषित करण्यात आले. त्यानंतर हळू हळू या सर्व सुविधांमध्ये वाढ करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड ठिकठिकाणी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड सेंटरमध्ये वाढ करण्यात आली असून अनेक ठिकाणी आता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. कोरोनानंतर यासर्व सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील सुविधांमध्ये वाढ
शहरी भागासोबतच ग्रामीण भागात आता सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अद्ययावत मशिनरी ग्रामीण भागात उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या वर्षभराच्या कालावधीत या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागासाठी स्वतंत्र ७० व्हेंटीलेटर प्राप्त झाले होते.
सर्वच तालुक्यात उपाययोजना
ग्रामीण भागांसाठी चाळीसगाव, अमळनेर, मुक्ताईनगर, चोपडा, भुसावळ अशा ठिकाणी अधिक सुविधा उपलब्घ करून देण्यावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे. यात आता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
कोरोना पूर्वी व कोरोना नंतर
सरकारी रुग्णालय : कोराना आधी १, कोरोनानंतर : ३
खासगी रुग्णालये कोविड सेंटर : पहिली लाट १००, दुसरी लाट १५२
ऑक्सिजन निर्मिती प्लांट : कोरोना आधी ०, कोरोनानंतर १२, (प्रगतीपथावर)
आयसीयू बेड : कोरोना आधी : २५ : कोरोना नंतर १००
व्हेंटीलेटर : कोरोना आधी ०६, कोरोनानंतर १५० पेक्षा अधिक
तिसऱ्या लाटेसाठी आपण आता सज्ज आहोत. सर्वच पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येत आहेत. आधीच्या तुलनेत आता सुविधांमध्ये भर पडली आहे. भविष्यात यांचा मोठा फायदा होणार आहे.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.