कोरोना रुग्ण घटले पण प्रलंबित अहवालांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:59+5:302021-02-26T04:22:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात सलग तीन दिवस तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत काहीशी घट ...

Corona patients decreased but the number of pending reports increased | कोरोना रुग्ण घटले पण प्रलंबित अहवालांची संख्या वाढली

कोरोना रुग्ण घटले पण प्रलंबित अहवालांची संख्या वाढली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात सलग तीन दिवस तीनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्यानंतर चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत काहीशी घट नोंदविण्यात आली. गुरुवारी कोरोनाचे २७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, चिंतेची बाब म्हणजे प्रलंबित अहवालांची संख्या वाढून २३४० वर पोहोचली आहे. दरम्यान, जळगाव शहरात पुन्हा शंभरापेक्षा अधिक १२२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सोमवारी २७९ नवे रुग्ण आढळले तर १३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एका ४६ वर्षीय व ६४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. दोनही मृत्यू खासगी रुग्णालयात झाल्याची नोंद आहे. गेल्या काही दिवसांपासून तपासण्यांची संख्या वाढली आहे, यासाठी प्रयोगशाळा २४ तास कार्यन्वित राहत असून येथील डॉक्टरांवर प्रचंड भार वाढला आहे. अशा स्थिती प्रलंबित अहवालांची संख्या वाढली आहे.

पूल टेस्टिंगचा प्रयोग

एकाच वेळी पाचपेक्षा अधिक काही नमुन्यांची एकत्रित तपासणी केली जाते, हा पूल निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा तपासणी करण्याची गरज नसते, मात्र, हा पूल पॉझिटिव्ह आल्यानंतर पुन्हा या नमुन्यांची स्वतंत्र तपासणी करावी लागते. हा प्रयोग आता प्रयोगशाळेत राबविला जात आहे. मध्यंतरी बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा अधिक आल्याने तो बंद करण्यात आला होता.

शहरातील केंद्रावर तुफान गर्दी

बाधितांचे प्रमाण वाढताच शहरातील तंत्रनिकेतन विद्यालयातील कोरोना तपासणी केंद्रावर प्रचंड गर्दी होत असून तपासणीचे प्रमाण आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आठवड्यापूर्वी तपासणीला तीस ते चाळीस लोक होते. तीच संख्या आता पाचशेवर पोहोचली आहे. गुरुवारी या ठिकाणी २५० आरटीपीसीआर तर १४० ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या.

विवाह सोहळा अंगाशी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका कोरोना कक्षात वीस जण दाखल असून यातील दहा जण हे एकाच कुटुंबातील आहेत. या कुटुंबातील सर्वच वयोगटातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष बाब म्हणजे या सर्वांना विवाहसोहळ्यातून झाल्याची माहिती आहे.

या भागात दोन किंवा अधिक रुग्ण

शहरातील अयोध्यानगर, देवेंद्र नगर, मू. जे महाविद्यालयाचा परिसर, शिवकॉलनी या भागात प्रत्येकी ४, आदर्शनगर, महाबळ, दिनकरनगर या भागात प्रत्येकी ३ तर समर्थ कॉलनी, प्रज्ञा कॉलनी, द्रौपदीनगर, शाहू नगर, खोटे नगर, सुयोग कॉलनी, दीक्षित वाडी, मोहाडी रोड या भागात प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले आहेत.

जळगाव, चाळीसगावच हॉटस्पॉट

जळगाव शहर : १२२

चाळीसगाव : ४५

चोपडा : ३३

मुक्ताईनगर :२०

जामनेर : १८

चाचण्या आणि अहवाल

गुरुवारी झालेल्या एकूण चाचण्या : २४२६

गुरुवारी आलेले आरटीपीसीआर अहवाल : ९२१

प्रलंबित अहवाल २३४०

रुग्ण असे

सक्रिय रुग्ण : १९२९

लक्षणे नसलेले : १४१५

लक्षणे असलेले : १९२९

पॉझिटिव्हिटी

आरटीपीसीआर : १२.८८ टक्के

ॲन्टिजेन : १७.३७ टक्के

Web Title: Corona patients decreased but the number of pending reports increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.