कोरोना प्रतिबंधक लसीकरण नियमीत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:29 AM2021-03-13T04:29:07+5:302021-03-13T04:29:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव शहरातील जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे नियमीत प्रमाणे सुरू होते़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव शहरातील जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी कोरोना प्रतिबंधक लसीकरण हे नियमीत प्रमाणे सुरू होते़ रोटरी भवनातील केंद्रावर नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजेच्या सुमारास ज्येष्ठांची गर्दी होती़ या ठिकाणी दररोज २०० जणांना लस दिली जात आहे़ दरम्यान, यात ज्येष्ठ नागरिकांचीच संख्या अधिक असल्याचे चित्र होते़
शहरातील महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात तसेच रोटरी भवनात शासकीय लसीकरण केंद्र असून खासगी ८ केंद्रांवर हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे़ महापालिकेच्या रूग्णालयात सरासरी साडे तीनशे लोकांना रोज लस दिली जात आहे़ तर रोटरी भवन येथे दोनशे जणांना नियमीत लस दिली जात आहे़ जळगावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे़ मात्र, याचा लसीकरणावर कुठलाही परिणाम जाणवला नाही़ ज्येष्ठांनी नेहमीप्रमाणे लसीकरणाच्या ठिकाणी जावून लस घेतली़ दरम्यान, लसीकरण आता दर सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ राम रावलानी यांनी दिली आहे़
रोटरी भवनात व्यवस्था
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील लसीकरणाचे केंद्र आठवडाभरापासून रोटरी भवनात हलविण्यात आले आहे, मात्र, या ठिकाणी सुरूवातीला पहिले दोन दिवस काहीसे गोंधळाचे वातावरण होते़ वृद्धांना बाहेर बसायलाही जागा नव्हती, मात्र, ही समस्या सोडविण्यात आली असून आता आधीच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाहेर खुर्च्या दिल्या जात आहेत़