कोरोनामुळे ५० टक्के घरपट्टी माफीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:33 PM2020-08-06T13:33:39+5:302020-08-06T13:34:06+5:30
जळगाव : तब्बल पाच महिन्यानंतर होणाऱ्या महासभेसाठी प्रशासनाकडून बुधवारी अजेंडा काढण्यात आला. यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या उद्योग-धंद्यावर ...
जळगाव : तब्बल पाच महिन्यानंतर होणाऱ्या महासभेसाठी प्रशासनाकडून बुधवारी अजेंडा काढण्यात आला. यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या उद्योग-धंद्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजपातर्फे १२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणाºया महासभेत ५० टक्के घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच अनेक कर्मचारी चहा पिण्याचे नाव सांगून बाहेर जात असल्यामुळे, प्रशासनातर्फे मनपा इमारतीमध्येच ‘उपहार गृह’ सुरू करण्याबाबत या प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
कोरोनामुळे पहिल्यादांच होणाºया आॅनलाईन महासभेत प्रशासकीय व अशासकीय अशा ३१ विषयांवर चर्चा होणार आहे. या संदर्भात प्रशासनातर्फे नगरसेवकांना माहिती पुस्तिका देण्यात आली असून, सभेचा अजेंडाही पाठविण्यात आला आहे. २० प्रशासकीय व अकरा अशासकीय प्रस्ताव आहेत. घरपट्टी माफीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.