कोरोना नमुने तपासणीसाठी पर्याय हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:40+5:302021-02-26T04:22:40+5:30
कोरोनाच्या नियमती पंधराशेपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या आता दोन हजारांच्या ...
कोरोनाच्या नियमती पंधराशेपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. त्यामुळे प्रलंबित अहवालांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही संख्या आता दोन हजारांच्या वर पोहोचली आहे. अहवालांना होणारा विलंब हा कोरोना वाढविण्यास अधिक कारणीभूत ठरू शकतो, आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर संबधितांना एक संदेश जातो, घरीच राहण्यासंदर्भता त्यांना सूचित केले जाते, मात्र, प्रत्येक जण घरीच थांबेल याची शाश्वती कोणीच घेत नाही, ही त्या त्या नागरिकाची जबाबदारी मग अशी माणसे अनेक वेळा बाधित असूनही दोन ते तीन दिवस अहवालास विलंब होत असल्याने घरी न थांबता बाहेर पडली आणि संसर्गाची कारण बनली तर याला जबाबदार कोण? त्यामुळे अहवाल अधिकाधिक ४८ तासांच्या आत अहवाल अपेक्षित आहेत. नाहीतर, जिल्ह्यातील रुग्णवाढीचा स्थिती गेल्यावर्षीसारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यंत्रणा आहे मात्र, तीचा पुन्हा त्याच पद्धतीने वापर करून घेणे हे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.