कोरोनाने थांबविल्या पुन्हा पोलिसांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 12:31 PM2020-07-24T12:31:32+5:302020-07-24T12:31:44+5:30

१० आॅगस्टपर्यंत मुदतवाढ : अधिकारी, कर्मचारी ‘रिलॅक्स’

Corona stopped the police transfers again | कोरोनाने थांबविल्या पुन्हा पोलिसांच्या बदल्या

कोरोनाने थांबविल्या पुन्हा पोलिसांच्या बदल्या

Next

जळगाव : पोलिसांच्या बदल्यांची वेगवान प्रक्रिया सुरु असतानाच या सर्व बदली प्रक्रियेला गुरुवारी शासनाने १० आॅगस्टपर्यंत पुन्हा मुदतवाढ दिली आहे. यंदाच्या वर्षातील ही दुसरी मुदतवाढ आहे. दरम्यान, वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ते रिलॅक्स झाले आहेत.
कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वच विभागाच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांना एक वर्ष स्थगिती दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी १५ टक्के बदलीचा आदेश जारी करुन ३० जुलैच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले होते. या बदल्यांच्या विरोधात काही जणांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली.
दरम्यान, बदल्यांची प्रक्रीया सुरु झालेली असतानाच पुन्हा १० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश गुरुवारी धडकला. सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव गीता कुळकर्णी यांच्या स्वाक्षरीचा हा आदेश आहे.

कार्यकाळ पूर्ण झालेल्यांच्याच बदल्या
जिल्हा पोलीस दलात कार्यकाळ पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयात प्राप्त झाली होती. त्याशिवाय काही विनंती बदल्यांचेही अर्ज प्राप्त झाले होते. बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मंडळ नियुक्त करुन पुढील कार्यवाही सुरु झालेली असताना आता नव्या आदेशाने पुन्हा ब्रेक लागला आहे. दरम्यान, ज्या कर्मचाºयाचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे व अधिकाºयाचाही एका ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशांच्या बदल्या होणार आहेत. ज्यांचा कार्यकाळ बाकी आहे असे व विनंती बदल्यांचा विचार होण्याची शक्यता फारच कमी आहे. कार्यकाळ संपलेल्या कर्मचाºयांना नवीन आदेश दिलासा देणारा असला तरी तो १० आॅगस्टपर्यंतच आहे. त्यापुढे आणखी काय आदेश येतो हे सांगता येत नाही.

शासनाने बदल्यांना मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे १० आॅगस्टपर्यंत कोणत्याच कर्मचारी व अधिकाºयाची बदली होणार नाही. नवीन आदेशानुसार पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे. हा आदेश अधिकारी व कर्मचाºयांनाही लागू आहे.
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

Web Title: Corona stopped the police transfers again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.