शिरसोली येथे रिकाम्या फिरणाऱ्या ११३ जणांची कोरोना टेस्ट; दहाजण आढळले बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:50+5:302021-04-23T04:17:50+5:30
शिरसोली प्र.बो. येथे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार यांना सूचना करून शिरसोली ...
शिरसोली प्र.बो. येथे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार व नायब तहसीलदार यांना सूचना करून शिरसोली गावात प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाशी बोलणी करून बाहेर कारण नसताना फिरणाऱ्या ११३ जणांची कोरोना टेस्ट केली. आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी नीलेश अग्रवाल, डॉ. तेजस्वीनी देशमुख, अनिल महाजन व नीलेश चौधरी यांनी ही मोहीम राबविली. यावेळी दहाजण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. त्यांना उपचारासाठी ईकरा कोविड सेंटरला पाठविण्यात आले. यावेळी सरपंच प्रदीप पाटील, पोलीस पाटील शरद पाटील,प्रवीण पाटील, नितीन बुंधे, प्रवीण बारी, ग्रामपंचायत कर्मचारी चिंधू बारी, तुषार बारी व शिवदास बारी व इतर सदस्यांनी लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्या दोन दुकानदारांना दंडही ठोठावला.
-------------------------------
फोटो कॅप्शन : कोरोनाची टेस्ट करताना मार्गदर्शन करताना नामदेवराव पाटील, दिलीप बारी, प्रदीप पाटील, तेजस्विनी देशमुख, अनिल महाजन, नीलेश चौधरी, प्रवीण पाटील, प्रवीण बारी व इतर.