वर्षभरात कोरोनाचा शून्य ते ७७ हजारपर्यंत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:10+5:302021-03-23T04:17:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला २३ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला २३ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. ज्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाले, त्या दिवसापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव नव्हता, मात्र, पाच दिवसांनी रुग्ण समोर आल्यानंतर सुरू झालेली कोरोनाची दहशत वर्षभरानंतर पुन्हा निर्माण झाली आहे. या वर्षभरात् रुग्णसंख्या शून्यावरून थेट ७७ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून शांत असलेल्या कोरोनाने अचानक डोकेवर काढले असून जिल्ह्यातील रुग्णालये फुल्ल झालेली आहेत.
उपाययोजना आणि वास्तव
१ जीएमसीत सर्व बेड ऑक्सिजन पाइपलाइनअंतर्गत आणली : असे असले तरी सद्यस्थितीत मनुष्यबळाच्या मुद्द्यावरून याचा पूर्णत: उपयोग करता येत नाहीय.
२ शासकीय यंत्रणेत मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर्स उपलब्ध झाले : मात्र, जागा आणि डॉक्टर नसल्याने अनेक व्हेंटिलेटर वापरात नाहीत.
३ तालुकास्तरावर ऑक्सिजन बेड निर्माण केले. सद्यस्थितीत ते अपूर्ण आहेत.
४ खासगी रुग्णालयांना परवानगी आणि नियंत्रण : खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांसाठीच जागाच नाही
५ लवकर निदानावर भर : गेल्या दोन महिन्यांपूर्वी चाचण्यांची संख्या घटली होती.
६ गर्दीवर निर्बंध लावले : नियमांची अंमलबजावणी झाली नाही.
तेव्हा काय आता काय
२३ मार्च २०२० रोजी जिल्ह्यात काही प्रमाणात संशयित रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र कक्ष विभागात दाखल होते.
२२ मार्च २०२१ रोजी जिल्ह्यात ७७ हजार ३८० रुग्ण आहेत., १४९० रुग्णांचा मृृत्यू झाला आहे. ९७०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
२३ मार्च २०२० रोजी जिल्ह्यात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही कक्षांमध्ये कोविडची व्यवस्था होती.
२२ मार्च २०२१ मध्ये जीएमसी पुन्हा पूर्णत: कोविड झाले असून अनेक खासगी रुग्णालये कोविड झाली आहेत. स्थानिक पातळ्यांवर कोविड उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोविड केअर सेंटर उघडण्यात आले आहेत.
डॉक्टरांचा मुद्दा कायम
गेल्या वर्षी डॉक्टर नसल्याने अनेक अडचणींचा सामना यंत्रणेला करावा लागला होता. सेवेवरही याचा परिणाम झाला होता. तेव्हा अन्य जिल्ह्यातून डॉक्टरांना प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. त्यानंतर काही डॉक्टर हे बाँडवर रुजू झाले होते. मात्र, पुन्हा या मुद्द्याने डोके वर काढले असून पुन्हा २० डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहेत.
वर्षभरात असा वाढला कोरोना दर महिन्याची रुग्णसंख्या
मार्च ०१
एप्रिल : ३६
मे : ७०३
जून : २८१०
जुलै : ७३७३
ऑगस्ट : १६२०३
सप्टेंबर : २००४८
ऑक्टोबर : ५०१३
नोव्हेंबर : १३६८
डिसेंबर : १३६०
जानेवारी : १११३
फेब्रुवारी : ३८४४
मार्च २२ पर्यंत : १६५०२
२८ मार्च पहिला रुग्ण,
६ जुन १००० रुग्ण
२७ जुलै १० हजार रुग्ण
७ ऑक्टोबर ५० हजार रुग्ण