बँक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राध्यान्याने द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:15 AM2021-03-20T04:15:07+5:302021-03-20T04:15:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सर्व बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वयाची अट न घालता त्यांना तातडीने अत्यावश्यक सेवा म्हणून ...

Corona vaccine should be given to bank employees as a priority | बँक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राध्यान्याने द्यावी

बँक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्राध्यान्याने द्यावी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सर्व बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वयाची अट न घालता त्यांना तातडीने अत्यावश्यक सेवा म्हणून कोरोनाची लस प्राध्यान्याने देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभैया पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे स्थानिकच नव्हे, तर जागतिक स्तरावर जनजीवन विस्कळीत झाले आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या भीषण परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेची अविरत सेवा केली. सर्वच फ्रन्टलाइन वॉरियर्सला वयाची अट न घालता, ६० वर्षांवरील सर्वांना, तसेच ४५ वर्षांवरील रुग्णांना शासन प्राधान्य देऊन कोरोनाची लस देत आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत बँकेचे अधिकारी व कर्मचारी हे रुजू होते व त्यांनी केलेले कार्यदेखील अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाने मंजुरी दिली होती. अशा या सर्व बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना वयाची अट न घालता त्यांना तातडीने अत्यावश्यक सेवा म्हणून कोरोनाची लस प्राध्यान्याने देण्यात यावी, अशी मागणी ॲड. रवींद्रभय्या यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Corona vaccine should be given to bank employees as a priority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.