जिल्हा परिषदेत कोरोना योद्धा महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 08:47 PM2021-03-09T20:47:07+5:302021-03-09T20:47:07+5:30

जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जि.प.बहुउद्देशीय आरोग्यसेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना व प्रतिभा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना ...

Corona Warrior Women Officers, Staff Pride in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत कोरोना योद्धा महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

जिल्हा परिषदेत कोरोना योद्धा महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

Next


जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जि.प.बहुउद्देशीय आरोग्यसेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना व प्रतिभा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद येथे पार पडला.
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, सहायक प्रशासन अधिकारी व प्रतिभा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा सुर्वे, संघटनेच्या अध्यक्षा इंदिरा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यांचा झाला सन्मान

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना अटाळे, कार्यालय अधीक्षक आबेदा तडवी, पर्यवेक्षिका जागृती तायडे, उर्दू शिक्षिका रजिया पठाण, प्राथमिक शिक्षिका ललिता पाटील, प्रयोग शाळा तंत्रज्ञ मेघा चौधरी. डाटा ऑपरेटर वैशाली भालेराव, आरोग्यसेविका चंद्रकला चव्हाण, आरोग्य सहायक आशा गजरे, अंगणवाडीसेविकास अनिता पाटील, कल्पना वायसे, अंगणवाडी मदतनीस प्रमिला पाटील, मदतनीस मीना सुळे, परिचर नंदा अवचर, आशा वर्कर शोभा बारेला, स्वच्छता कर्मचारी आशा महाजन आदींचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेतील सेवा निवृत्त अधिकारी चंद्रकांत संत यांची नात समृद्धी हर्षल संत हिने दिल्ली परेडमध्ये देशातील एनसीसी मुलींच्या पथकाचे नेतृत्व केले, त्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला.

यांनी घेतले परिश्रम

सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक ग.स.सोसायटीच्या माजी संचालिका प्रतिभा सुर्वे यांनी, तर आभार शैलजा पाटील यांनी मानले, तसेच साळवा येथील उपशिक्षिका ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी मंगेश बाविस्कर, अजय चौधरी, धनराज सोनवणे, संजय सूर्यवंशी, कल्पना चव्हाण, सरला पाटील, रेखा बडगुजर, रत्ना तायडे, रामेश्वर कुंभार, बळीराम सुर्यवंशी, भूषण तायडे, वसंत बैसाणे, माधुरी बेहेरे, छाया पाटील आदींसह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

Web Title: Corona Warrior Women Officers, Staff Pride in Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.