निंभोरा येथे कोरोना योद्ध्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:16 AM2021-05-26T04:16:08+5:302021-05-26T04:16:08+5:30
कजगाव, ता. भडगाव : एक वर्षापासून कोरोनाच्या विरोधात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आपला व परिवाराचा जीव धोक्यात घालून ...
कजगाव, ता. भडगाव : एक वर्षापासून कोरोनाच्या विरोधात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आपला व परिवाराचा जीव धोक्यात घालून फ्रंटलाइन वर्कर म्हणून अविरत आरोग्यसेवा देऊन कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. निंभोरा येथे तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुचिता आकडे, जि.प. सदस्य संजय पाटील, सभापती डाॅ. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड-१९ लसीकरणाचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी निंभोरा ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा व आरोग्य विभागातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भडगावच्या सभापती डाॅ. अर्चना पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणात आरोग्य विभागातील सर्वांचे कौतुक केले. गेल्या वर्षभरापासून आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी जिवाची बाजी लावून कोरोनासारख्या महामारीत दिवस-रात्र आरोग्यसेवा देऊन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
याप्रसंगी आरोग्य केंद्र कजगावचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत पाटील, चाळीसगाव येथील माताजी हाॅस्पिटलचे डाॅ. विशाल पाटील, सरपंच दिलीप पाटील, माजी उपसरपंच विश्वास पाटील, पोलीस पाटील शरद पाटील, ग्रामसेविका सुनीता चौधरी, ग्रा.पं. सदस्य साहेबराव पाटील, त्र्यंबक पाटील, ग्रा.पं. कर्मचारी पुंडलिक कोळी, समाधान पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.