केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:17 AM2021-05-11T04:17:31+5:302021-05-11T04:17:31+5:30
मास्क व सॅनिटायझर वाटप जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात गरीब, कष्टकरी बांधवांना कोरोनापासून संरक्षण होण्याकरिता जळगाव ...
मास्क व सॅनिटायझर वाटप
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात गरीब, कष्टकरी बांधवांना कोरोनापासून संरक्षण होण्याकरिता जळगाव युथ फाउंडेशनतर्फे नेहरू चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांच्याहस्ते सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले. संस्थेचे पदाधिकारी गिरीश पाटील, ललित आमोदकर, रोहित शिरसाठ, शंकर पवार, धनंजय आमोदकर, भागेश पाटील आदी उपस्थित होते.
सणांच्या पार्श्वभूमीवर दुकाने सुरू करा
जळगाव : अक्षयतृतीया व रमजान ईद सणासाठी जिल्ह्यातील कापड, पादत्राणे व इतर दुकाने सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. या विषयी उपजिल्हाधिकारी (महसूल) रवींद्र भारदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सणांच्या काळात नागरिकांना खरेदी करावी लागते. त्यामुळे ११ ते १४ मे या दरम्यान सकाळी सात ते अकरा या वेळेत दुकाने सुरू ठेवावी अशी मागणी केली आहे.
राजीव जामोदकर यांची निवड
फोटो क्रमांक ११ सीटीआर २०
जळगाव : शासकीय पुनर्नियुक्ती माजी सैनिक संघटनेची ऑनलाईन निवडणूक होऊन यात राज्य उपाध्यक्षपदी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील राजीव जामोदकर हे विजयी झाले. या राज्यस्तरीय निवडणुकीत राज्याध्यक्षपदी उपाध्यक्ष बाजीराव देशमुख (सांगली), उपाध्यक्षपदी राजीव जामोदकर (जळगाव) सरचिटणीस म्हणून संतोष मलेवार (नागपूर) आदी विजयी झाले.
वेबिनारमध्ये मार्गदर्शन
जळगाव : केशव स्मृती प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन वेबिनारमध्ये मार्गदर्शन करण्यात आले. ९ ते ११ मे दरम्यान दुपारी ४.३० वाजता सामाजिक संस्थांसाठी या वेबिनारचे आयोजन केले आहे. ९ मे रोजी मुंबई येथील शैलेश निपुणगे यांनी केंद्र सरकारने सामाजिक संस्थासाठी केलेले नवीन कायदे, १० मे रोजी सामाजिक संस्थांसाठी सोशल मीडियाचा प्रभावी उपयोग या विषयावर मुंबईतील मिलिंद आरोलकर यांनी माहिती दिली. सेवा संस्था प्रमुख भरत अमळकर यांनी ऑनलाइन संवाद साधला. खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, पत्रकारिता, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपक्रमाचे कौतुक केले.