आठ ठिकाणी कोरोना शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:19 AM2021-02-09T04:19:01+5:302021-02-09T04:19:01+5:30
शहरात रुग्ण वाढले जळगाव : जळगाव शहरात सोमवारी रुग्णवाढ समोर आली. २९ बाधित रुग्ण आढळून आले असून शहरातील रुग्णांची ...
शहरात रुग्ण वाढले
जळगाव : जळगाव शहरात सोमवारी रुग्णवाढ समोर आली. २९ बाधित रुग्ण आढळून आले असून शहरातील रुग्णांची संख्या १३६०३ ऐवढी झाली आहे. त्यातील १३१३८ रुग्ण बरे झालेले आहेत. ३०० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सर्वाधिक मृत्यू जळगाव शहरातील बाधितांचेच झालेले आहे.
कर्मचारी कमी
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रशासकीय कामे करण्यासाठी कर्मचारी संख्या कमी असल्याने याचा अन्य कर्मचाऱ्यांवर भार येत आहे. यामुळे कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न होत असला तरी प्रत्यक्षात कुठल्याही निर्णयाची अमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.
पोस्ट कोविड ओपीडी बंद?
जळगाव : कोरोनानंतर उद्भवणारे त्रास यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालात पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात आली होती. मात्र, यात रुग्णच तपासणीला येत नसल्याने सोमवारची ही ओपीडी जवळपास बंद झाल्यात जमा आहे. औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या अंतर्गत दोन डॉक्टरांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती.