कोरोनाच्या विखळ्यात, तरीही गावागावात लग्न झाले दणक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:08+5:302021-04-21T04:17:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होते. यंदा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या तीन ते चार महिन्यांच्या ...

In Corona's divorce, the village still got married | कोरोनाच्या विखळ्यात, तरीही गावागावात लग्न झाले दणक्यात

कोरोनाच्या विखळ्यात, तरीही गावागावात लग्न झाले दणक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू होते. यंदा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या तीन ते चार महिन्यांच्या काळात जोरदार लग्न सोहळे झाले.

मात्र फेब्रुवारीपासून शासनाने कडक नियम लागु केले. तरीही कोरोना आणि शासनाच्या नियमांना झुगारून जिल्ह्यातील विविध गावामध्ये हजारो लग्नांचा बार उडाला.

यंदा लग्न सराई सुरू झाल्यापासून हजारो लग्न सोहळे मोठ्या प्रमाणात साजरे झाले आहेत. काही दिवसांपुर्वी जिल्हा प्रशासनाने लग्नसोहळे घरच्या घरीच साजरे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात २० जणांची उपस्थितीचा नियम लागू करण्यात आला होता. तरी देखील अनेकांनी जळगाव शहरात देखील थाटामाटात लग्न लावले. नियम मोडल्याने शहरातील एका हॉटेलवर गुन्हा दाखल झाला आहे. असे असतांनाही जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेकडो सोहळे नियम मोडून साजरे करण्यात आले आहेत. असे असले तरी काहींनी नियम शिथील होतील, या अपेक्षेवर तारखांवर तारखा

बदलल्या आहेत. अनेक जण परिस्थिती निवळेल, अशी वाट पाहत आहेत. मे महिन्यात यंदा सर्वाधिक १५ लग्नतिथी आहेत. मात्र १ मे पर्यंत संचारबंदीच लागू करण्यात आली आहे.

जानेवारीपासून १४७ नोंदणीकृत विवाह

यंदा जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत १४७ विवाह हे नोंदणीपद्धतीने करण्यात आले आहेत. तसेच २५० जोडप्यांनी विवाहाची एक महिना आधी दिली जाणारी नोटीस दिली आहे, यंदा विवाहाचे ५३ मुहुर्त १९ जानेवारीते २१ एप्रिल प्रयंत यंदा गुरु आणि शुक्र अस्तामुळे तारखा मीच आहेत. सध्या २२ एप्रिल ही विवाहाची मोठी तिथी आहे. यंदा कोरोनााने अडचण केली असली तरी नोव्हेंबर ते जुलै या काळात ५३ विवाह मुहुर्त आहेत. एप्रिलमध्ये ७ मे मध्ये १५ आणि जून महिन्यात फक्त ४ तारखाच आहेत. तसेच जुलै महिन्यात देखील चार विवाह मुहुर्त आहेत.

कोट -

यंदा अजून एकही मंगल कार्यालयाचे बुकिंग झालेले नाही. शहरात तर कुणी मंगल कार्यालयांमध्ये विचारणा करण्यासाठी देखील येत नाही. त्यामुळे व्यावसायीक अडचणीत आले आहेत. टेन्ट देखील कुणीही टाकत नाही. काही ठिकाणी मंगल कार्यालयांमध्ये तर कोविड सेंटर देखील सुरू झाले आहेत. - प्रदीप जैन,

अध्यक्ष, जिल्हा टेन्ट आणि मंगल कार्यालय असोसिएशन

Web Title: In Corona's divorce, the village still got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.