जिल्हाधिकारी कार्यालयाला कोरोनाचा विळखा; १८ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:17 AM2021-03-23T04:17:36+5:302021-03-23T04:17:36+5:30
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या झपाट्याने पसरत असून आता कोरोना उपाययोजना करणाऱ्या प्रशासकीय कामकाजाच्या ठिकाणीदेखील या संसर्गाने हातपाय ...
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या झपाट्याने पसरत असून आता कोरोना उपाययोजना करणाऱ्या प्रशासकीय कामकाजाच्या ठिकाणीदेखील या संसर्गाने हातपाय पसरले आहेत. गेल्या वर्षापासून सलग कामकाज करणाऱ्या महसूल विभागातील चार अधिकारी, नऊ कर्मचारी यांच्यासह जळगाव तालुक्यातील पाच तलाठ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
महिनाभरात वाढला संसर्ग
गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी महिनाभरातच महसूल विभागात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. हे अधिकारी कर्मचारी एक सोबत एवढ्या प्रमाणात बाधित न होता एक एक करीत आतापर्यंत १८ जण बाधित झाले आहे.
सप्टेंबर महिन्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाला. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. यामध्ये उपाययोजना करीत असतानाच महसूल विभागातीलदेखील संसर्ग वाढू लागला आहे. महिनाभरात जिल्हाधिकारी कार्यालयातील वेगवेगळ्या विभागातील चार अधिकारी, नऊ कर्मचारी यांच्यासह जळगाव तालुक्यातील पाच तलाठ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.