माजी नगरसेविकेसह पतीही कोरोनाचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:59 AM2020-07-10T11:59:55+5:302020-07-10T12:00:08+5:30

जळगाव : अयोध्यानगरातील एक माजी नगरसेविका व त्यांचे पती या दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे़ दोघांनाही डॉ़ ...

Corona's husband is also a victim of the former corporator | माजी नगरसेविकेसह पतीही कोरोनाचे बळी

माजी नगरसेविकेसह पतीही कोरोनाचे बळी

Next


जळगाव : अयोध्यानगरातील एक माजी नगरसेविका व त्यांचे पती या दोघांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे़ दोघांनाही डॉ़ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ सलग दोन दिवसात या दोघांचा मृत्यू झाला़ दरम्यान, अयोध्यानगरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून गुरूवारी पुन्हा दोन नवीन रुग्ण आढळून आले आहेत़ यासह शहरात गुरुवारी नव्या ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या ११९९ वर पोहचली आहे़
शहरात कोरोनाचा संसर्ग मात्र त्याच झपाट्याने वाढत आहे़ शिवाजीनगरात उद्रेक कायम असून गुरूवारी सात रुग्ण रुग्ण आढळले.
अयोध्यानगरातील माजी नगरसेविका व त्यांच्या पतीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर व त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले होते़ यात पतीचा ६ जुलै तर माजी नगरसेविकेचा ७ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ राम रावलानी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे़
या भागात आढळले रुग्ण
शिवाजी नगर ७, निवृत्तीनगर ५, श्रीराम नगर ४, सम्राट कॉलनी ३, अयोध्यानगर २, शनिपेठ २, इंद्रप्रस्थनगर, आंबेडकर नगर, भुरे मामलेदार प्लॉट, तांबापुरा, गेंदालाल मील, शिवशक्तीनगर, जोशी कॉलनी, स्टेट बँक कॉलनी, समाधान नगर, पिंप्राळा, विवेकानंद नगर - २ गणेश कॉलनी, विद्युत कॉलनी, एमआयडीसी, एलआयसी कॉलनी, शंकरराव नगर, खासगी रुग्णालय बीएसएनएल आॅफिजजवळ, भिकमचंद जैन नगर, भारत नगर, मास्टर कॉलनी, कांचननगर, गणेशवाडी २, सुप्रिम कॉलनी, खासगी रुग्णालय जिल्हापेठ, नूतन वर्षा कॉलनी, कोळीपेठ, ओम साई पोलीस कॉलनी, गुरूदत्तनगर खोटेनगर, टीबी रूग्णालयाजवळ, महावीर हौसिंग सोसायटी, आदर्शनगर, दिनकर नगर, गिताईनगर, दादावाडी, राधेश्याम कॉलनी, हरिविठ्ठल जवळ आरएमएस कॉलनी, तुळशीनगर, वाघनगर, मेहरूण तलावाजवळ, आदर्श नगर या भागात रुग्ण आढळले.

शहरातील दोघांसह आठ जणांचा मृत्यू
जळगावत शहरातील एक ५६ वर्षीय पुरूष, ५८ वर्षीय महिला यांच्यासह जामनेर २ व चाळीसगाव, पाचोरा, रावेर व पारोळा या तालुक्यातील प्रत्येकी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे़

Web Title: Corona's husband is also a victim of the former corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.