कोरोनाची ओपीडीही स्वतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:19 PM2020-03-25T12:19:27+5:302020-03-25T12:19:44+5:30

शासकीय रूग्णालयात व्यस्था : सकाळपासूनच तपासणीसाठी रांगा

 Corona's OPD is also independent | कोरोनाची ओपीडीही स्वतंत्र

कोरोनाची ओपीडीही स्वतंत्र

Next

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णलायात आता कोरोना तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने तपासणीही स्वतंत्र कक्षात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ त्यानुसार मंगळवारी दिव्यांग कक्षात नागरिकांची तपासणी करण्यात आली़ यात सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या़ दिवसभरात या कक्षात १९० जणांची तपासणी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे व परराज्यातून येणाऱ्यांची तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे़ शिवाय त्यांना लक्षणे आढळल्यास निकषानुसार त्यांचेही नमुने घेऊन ते पुण्याला पाठविण्यात येणार आहेत़ मात्र, अशातच तपासणीसाठी गर्दी होत असल्याने शासकीय रूग्णालयातील वार्ड एकमध्येच नोंद करून तपासणी होत होती़ मात्र, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून ही ओपीडी मंगळवारी स्वतंत्र करण्यात आली़ रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे़ या ओपीडीत गेटवर नोंदणी करून नंतर आतमध्ये डॉक्टर पूर्ण माहिती विचारून त्यानुसार औषधेही दिली जात होती व गरज भासल्यास वरिष्ठांकडे पाठविले जात होेते़ दरम्यान, रूग्णालयात येणाºया अन्य रूग्णांशी कोरोनाच्या तपासणीसाठी आलेल्यांचा संपर्क येऊ नये म्हणून ही ओपीडीही स्वतंत्र ठेवण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी सांगितले़
दरम्यान, रोटरीचे गोल्ड सीटीचे नंदू आडवाणी, सतीश मंडोरा, चंदर तेजवाणी, प्रशांत कोठारी यांनी सायंकाळी अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांची भेट घैतली़ कक्षात आवश्यक असणारे आणखी एका व्हँटीलेटरसह अन्य साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले़ यात मास्कच्या बाबतीतही चर्चा झाली़

रूग्णालयातील गर्दी कायम
-रूग्णालयात किरकोळ कारणांसाठी येणे टाळावे, असे आवाहन यंत्रणेकडून वारंवार होत असतानाही मंगळवारी अगदी किरकोळ कारणांसाठीअनेकांनी रूग्णालयात गर्दी केली होती़ यात काहींनी दाखले घेण्यासाठी हजेरी लावली होती़ अशातच अनेक वेळा नातेवाईक व डॉ क्टरांमध्ये शाब्दीक खटकेही उडाल्याचे चित्र होते़
-यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, म्हणून अत्यावश्यकता असेल तरच रूग्णालयात या, गर्दी करा, असे आदेश असतानाही त्याचे पालन होत नसल्याने यंत्रणेवर ताण पडत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे़

प्रशिक्षणार्थी सुट्टीवर
शासकीय वैद्यकी महाविद्यालय व रूग्णालयात असलेले प्रशिक्षणार्थी डॉक्टरर्स, इंटर्न्स अचानक सुटीवर गेल्यामुळे यंत्रणेवरील ताण अधिकच वाढला आहे़ आधीच कमी मनुष्यबळात सुरू असलेल्या या काराभाराने व आता कोरोनामुळे यंत्रणेवर अधिक ताण पडत असल्याचे चित्र आहे़

Web Title:  Corona's OPD is also independent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.