कोरोनाचे सर्वांसमोर पुन्हा आव्हान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:20+5:302021-03-05T04:17:20+5:30
कोरोनाचे आकडे पुन्हा फुगायला लागले आहेत. मध्यंतरी संख्या अगदीच वीस, पचंवीसच्या घरात राहत असल्याने कोरोना संपलाय असे चित्र निर्माण ...
कोरोनाचे आकडे पुन्हा फुगायला लागले आहेत. मध्यंतरी संख्या अगदीच वीस, पचंवीसच्या घरात राहत असल्याने कोरोना संपलाय असे चित्र निर्माण झाले होते. शासकीय कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली होती. काही मोजकीच सुरूच होती. नॉन् कोविड सुविधा सुरळीत सुरू होती. अशा स्थितीत अचानक कोरोना वाढायला सुरूवात झाली आणि यंत्रणेसमोरील आव्हाने पुन्हा वाढायला लागली आहे. आताच्या घडीला सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोरोनाचे आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल हे किमान ४८ तासात मिळणे हे होय, अहवालांना जर चार ते पाच दिवस, (काहींना सहा दिवसही लागत आहेत.) लागत असतील तर कोरोनाचा संसर्ग थांबणार कसा, या लोकांवर नियंत्रण कोणाचे. कोरोना बरे व्हायला दहा दिवसांचा अवधी लागतो, तेव्हा रुग्णाला घरी सोडले जाते, असा शासकीय नियम सांगतो. त्यानंतर सात दिवस घरी क्वारंटाईन राहायचे, मात्र, अहवालाच्या विलंबाने कोरोना आहे किंवा नाही हेच समजायला पाच दिवस लागत असतील, तर उपचार कधी, सुटी कधी, क्वारंटाईन कधी हा सर्व ताळमेळच चुकतोय, शिवाय संबधित व्यक्ती हे पाच दिवस घरीच थांबले याची शास्वती काय? अशा प्रश्नांची उत्तरे शोधून प्रशासनाला कोरोना रोखावा लागणार आहे. नागरिकांनी नियम पाळायचेच आहेत, गाफील राहणे हे सद्य स्थितीत सर्वात धोकादायक आहे...