भडगाव येथे क्षत्रिय मराठा परिवारामार्फत कोरोना योध्द्यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:16 AM2021-07-27T04:16:17+5:302021-07-27T04:16:17+5:30

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पाटील, जिल्हा कार्यकारी प्रमुख ज्ञानेश्वर भोसले, भडगाव तालुकाप्रमुख दिनानाथ ...

The coronation of the Corona warriors by the Kshatriya Maratha family at Bhadgaon | भडगाव येथे क्षत्रिय मराठा परिवारामार्फत कोरोना योध्द्यांचा गाैरव

भडगाव येथे क्षत्रिय मराठा परिवारामार्फत कोरोना योध्द्यांचा गाैरव

Next

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भाऊसाहेब पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पाटील, जिल्हा कार्यकारी प्रमुख ज्ञानेश्वर भोसले, भडगाव तालुकाप्रमुख दिनानाथ पाटील, भडगाव युवक प्रमुख वाल्मिक पाटील, जिल्हा महिला दक्षता प्रमुख गीता पाटील उपस्थित होते.

कोरोना विषाणू महामारीच्या संकटकाळात आपण कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. या कार्याची दखल घेत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भडगाव तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अशोक परदेशी यांनाही सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी सांगितले की, कोरोना काळात पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता अथक परिश्रम घेतले. जनतेची काळजी घेताना बंदोबस्तादरम्यान माझ्यासह काही पोलीस कर्मचारीही कोरोना बाधित झाले. पोलीस कर्मचाऱ्यांची दखल घेत आमचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनमार्फत त्यांनी क्षत्रिय मराठा परिवाराचे आभार मानले. पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. पंकज जाधव यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू शेख यांच्यासह पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. यावेळी जावीद शेख, भास्कर शार्दुळ, समाजसेवक महेंद्र ततार, हिरामण बाविस्कर यांनाही सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील सर्वच पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

260721\26jal_1_26072021_12.jpg

भडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांचेसह पोलीस कर्मचारी, पत्रकारांच्या सन्मानासाठी उपस्थित पदाधिकारी.

Web Title: The coronation of the Corona warriors by the Kshatriya Maratha family at Bhadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.