Coronavirus : धोका टळलेला नाही, जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांनी कोरोनाचा बळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 10:29 PM2022-06-15T22:29:50+5:302022-06-15T22:30:26+5:30

चाळीसगावच्या इसमाचा कोरोनामुळे मृत्यू

Coronavirus Coronavirus death victim in Jalgaon district after four months | Coronavirus : धोका टळलेला नाही, जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांनी कोरोनाचा बळी!

Coronavirus : धोका टळलेला नाही, जळगाव जिल्ह्यात चार महिन्यांनी कोरोनाचा बळी!

Next

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा एक बळी घेतला आहे. बुधवारी चाळीसगावच्या ६३ वर्षांच्या इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर जळगाव जिल्ह्यात चार महिन्यात झालेला हा पहिलाच बळी आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात कोरोनाचे २ हजार ५९१ बळी झाले होते. आजच्या या बळीसोबतच जळगाव जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत घेतलेला हा २ हजार ५९२ वा बळी ठरला आहे. तसेच बुधवारी दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत.

बुधवारी आढळून आलेल्यांपैकी एक जण चाळीसगाव आणि दुसरा चोपडा येथील आहे. तर सध्या एकूण १७ जण कोरोनावर उपचार घेत आहेत. या आधी फेब्रुवारी महिन्यात अखेरचा कोरोनाने बळी घेतला होता. त्यानंतर तिसरी लाटदेखील लगेच उतरणीला लागली होती. मधल्या काळात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्णदेखील नव्हते. आता पुन्हा एकदा हळूहळू कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यात जिल्ह्यात सध्या १७ जण उपचार घेत आहेत. त्यात सर्वाधिक आठ जण हे चोपडा तालुक्यातील आहेत. तर भुसावळला तीन आणि जळगाव शहरात एक जण उपचार घेत आहे.

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर, शारीरिक अंतर राखणं आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करणं गरजेचं असल्याचं आवाहन आरोग्य यंत्रणेने केलंय.

Web Title: Coronavirus Coronavirus death victim in Jalgaon district after four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.