CoronaVirus News: देशापेक्षा जळगावचा मृत्यूदर चौपट; ५६ दिवसांत ६८ मृत्यू;
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 02:31 AM2020-05-30T02:31:28+5:302020-05-30T06:09:06+5:30
गेल्या तीनच दिवसांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
- आनंद सुरवाडे
जळगाव : जिल्ह्यात कोरोना पाय पसरवतच चालला असताना गेल्या ५६ दिवसांत ६८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाचा मृत्यूदर २.८७ टक्के असून जळगावचा मात्र ११.४९ टक्के इतका आहे. देशाच्या तुलनेत हा मृत्यूदर चौपट आहे. गेल्या तीनच दिवसांमध्ये १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२ एप्रिल रोजी पहिला मृत्यू झाल्यानंतर २१ एप्रिलपासून मृतांची संख्या वाढत २८ मेपर्यंत अर्थात ५६ दिवसांत ६४ वर पोहोचली आहे़ भुसावळात सर्वाधिक १८ त्या खालोखाल अमळनेर १३ व जळगाव येथील ११ जणांचे मृत्यू झालेले आहेत़ रावेरमध्ये ११ बाधितांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला आहे़
मृत्यूदर ११.४९ टक्के असला तरी लॅब कार्यान्वित झाल्याने तपासणीची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णांचे निदान वाढेल मात्र मृत्यूदरही आपोआपच कमी होईल. कारण अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत यापूर्वी तपासणीचा आकडा आपला कमी आहे. रेल्वे आणि इतर रुग्णालयातही कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.
बाधित व मृत्यू
जळगाव : ५५७ (६८), औरंगाबाद : १,३६० (६३), मालेगाव : ७,२२, (४७), नाशिक : २९०, (५),
बुलडाणा - ५३ (०३)
देशातील स्थिती बरे होण्याचे प्रमाण - ४१.६१ टक्के
मृत्यूदर - २.८७ टक्के
जळगाव जिल्हा स्थिती
बरे होण्याचे प्रमाण - ४० टक्के
मृत्यूदर - ११.४९ टक्के