महामंडळाची दरमहा १० कोटींची शासनाकडे वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:10+5:302021-05-23T04:15:10+5:30

एसटी महामंडळ : वसुलीच्या उत्पन्नातुन होतो कर्मचाऱ्यांचा पगार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग ...

The corporation recovered Rs. 10 crore per month from the government | महामंडळाची दरमहा १० कोटींची शासनाकडे वसुली

महामंडळाची दरमहा १० कोटींची शासनाकडे वसुली

googlenewsNext

एसटी महामंडळ : वसुलीच्या उत्पन्नातुन होतो कर्मचाऱ्यांचा पगार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव यासह विद्यार्थी व विविध पुरस्कार प्राप्त नागरीकांना बस मध्ये प्रवासात सवलत दिली जाते. तर या सवलतीची रक्कम मिळण्याबाबत दर महिन्याला महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला जातो व तेथून शासनाकडे पाठवला जातो. त्यानुसार जळगाव विभागातून विविध शासकीय सवलतींच्या पोटी महामंडळाकडे दरमहा १० कोटींच्या वसुलीचा प्रस्ताव पाठवण्यात येत असतो. कोरोनामुळे प्रवासी संख्या घटल्याने प्रस्तावाची रक्कम कमी झाली असली तरी, या वसुलीच्या रक्कमेतून कर्मचाऱ्यांचे पगारासाठी मोठा हातभार लागत असल्याचे महामंडळातर्फे सांगण्यात आले.

महामंडळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार इयत्ता १ ली ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना अहिल्या बाई होळकर योजने अंतर्गत शिक्षणासाठी मोफत पास दिला जातो. असे एकूण जळगाव विभागातील लाभार्थी विद्यार्थिनींची संख्या २१ हजार ७५९ असून याचे प्रवासी भाडे मूल्य २ कोटी ४४ लाख ९५ हजार ४८ रुपये इतकी रक्कम होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांची संख्या २ लाख ६५ हजार ४३० असून, याचे प्रवासी भाडे मूल्य ३ कोटी ५० लाख १८ हजार ६५६ रूपये होतात. तसेच विविध शासकीय पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, दिव्यांग बांधव, अधिस्वीकृती पत्रकार, गंभीर व्याधी अशा प्रकारच्या विविध घटकातील लाभार्थ्यांना महामंडळ प्रशासनाकडून सवलत दिली जाते व सवलतीच्या रक्कमेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जात असतो.

इन्फो :

१) जिल्ह्यातील एकूण आगार : ११

२) एकूण कर्मचारी साडेचार हजार

३) सध्याचे रोजचे उत्पन्न दीड ते दोन लाख

४) महिन्याला पगारावर होणारा खर्च ८ कोटी

इन्फो :

वसूलीच्या उत्पन्नाचा मोठा आधार

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या विविध सवलती पोटी जी रक्कम वसुल होते. ती रक्कम वसुलीसाठी जळगाव विभागातून महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे वसुलीचा प्रस्ताव पाठवला जातो व त्या ठिकाणाहुन तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला जातो. त्यानंतर शासनाकडून दिली जाणारी रक्कम आमच्याकडे न येता, मुख्य कार्यालयाकडे वर्ग होते. या रक्कमेतुन महामंडळ प्रशासन पगारासाठी किंवा इतर खर्चासाठीही पैसा वापरते.

भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव

इन्फो :

तर कर्मचाऱ्यांवर पुन्हा आले असते आर्थिक संकट

गेल्या वर्षी बससेवा बंद असल्याने, उत्पन्नही बंद होते. यामुळे कर्मचाऱ्यांचे अनेक महिने पगार रखडल्याने, त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागला.मात्र, यंदा शासनाने एका कर्मचाऱ्याच्या मृत्युच्या घटनेनंतर महामंडळाची जबाबदारी उचल्याने पगार वेळेवर होत आहेत.

संतोष धाडी, वाहक

राज्य शासनाने आर्थिक संकटात सापडलेल्या महामंडळ प्रशासनाला मदत केल्यामुळे, सध्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार होत आहेत. अन्यथा पुन्हा गेल्या वर्षा सारखी परिस्थिती निर्माण झाली असती. सध्या वेळेवर पगार होत असल्याने कर्मचारी ताण तणावापासून दूर आहेत.

भालचंद्र हटकर, चालक

सध्या महामंडळ प्रशासनाचे शासनाकडे विविध सवलतींचे जे पैसे थकीत होते. ते शासनातर्फे टप्प्या-टप्प्याने देण्यात येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत आहे. पगारा अभावी तर गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

रविंद्र पाटील, वाहक

Web Title: The corporation recovered Rs. 10 crore per month from the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.