मनपाची १८ रोजी महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:37+5:302021-02-10T04:16:37+5:30
जळगाव - महापालिकेच्या महासभेचे आयोजन १८ रोजी करण्यात आले असून, एकाच दिवशी नियमित सभेसोबतच विशेष सभा देखील घेतली ...
जळगाव - महापालिकेच्या महासभेचे आयोजन १८ रोजी करण्यात आले असून, एकाच दिवशी नियमित सभेसोबतच विशेष सभा देखील घेतली जाणार आहे. या महासभेत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत देखील महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मनपाकडून गाळे लिलावाचा प्रस्ताव सादर केला जाणार असून, या विषयाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.
बळीराम पेठेतील हॉकर्सला जुनी पालिकेची जागा द्या
जळगाव - शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक भागातील विस्थापीत हॉकर्सला जुन्या नगरपालिकेतील जागा द्यावी अशी मागणी जिल्हा कॉग्रेस कमिटीचे सरचिटणीस विष्णु घोडेस्वार यांनी केली आहे. याबाबत घोडेस्वार यांनी २०१९ मध्ये आमरण उपोषण देखील केले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घोडेस्वार यांच्या मागणीची दखल घेत ही जागा हॉकर्सला देण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले होते.
गणेश कॉलनी चौकात अतिक्रमण कारवाई
जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाकडून शहरातील गणेश कॉलनी चौकातील अनधिकृत हॉकर्सवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान एकूण १४ हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला. यासह बळीराम पेठ, सुभाष चौक भागात देखील मोठी कारवाई करण्यात आली. यावेळी हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वाद देखील झाला.
उपमहापौरांकडून तक्रारींचा निपटारा
जळगाव - मनपा उपमहापौर सुनील खडके यांच्या जनता दरबारात आलेल्या तक्रारींचा निपटारा सुरु असून, आतापर्यंत १०० हून तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती उपमहापौर सुनील खडके यांनी दिली. यासह मनपा प्रशासनाकडे अडकलेल्या कामांबाबत देखील संबधित विभागप्रमुखांना पत्र पाठविण्यात आल्याची माहिती खडके यांनी दिली.