मनपाच्या ‘वसुली मिशन’ ला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:16 AM2021-03-05T04:16:14+5:302021-03-05T04:16:14+5:30

-एकूण वसुली ७६ कोटींची मागणी -आतापर्यंत झालेली वसुली ४५ कोटी अंदाजे -वसुलीसाठी १२ पथकांची नियुक्ती -२६ दिवसात ४० ते ...

Corporation's 'Recovery Mission' begins | मनपाच्या ‘वसुली मिशन’ ला सुरुवात

मनपाच्या ‘वसुली मिशन’ ला सुरुवात

Next

-एकूण वसुली ७६ कोटींची मागणी

-आतापर्यंत झालेली वसुली ४५ कोटी अंदाजे

-वसुलीसाठी १२ पथकांची नियुक्ती

-२६ दिवसात ४० ते ५० टक्के वसुलीचे आव्हान

- शहरात १ लाख १० हजार मालमत्ताधारक

-बडे थकबाकीदार रडारवर

- मालमत्ता कराची रक्कम न भरल्यास नळ कनेक्शन होणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराची रक्कम भरण्याची ३१ मार्च पर्यंत शेवटची मूदत असून, मनपाने सालाबादाप्रमाणे मार्च एंडीगच्या पार्श्वभूमीवर वसुलीसाठी कंबर कसली आहे. मनपाने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रभाग समिती निहाय प्रत्येकी ३ अशा १२ पथकांची नियुक्ती केली आहे. दररोज शहरातील प्रत्येक भागात वसुलीची मोहीम राबविण्याचा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच बड्या थकबाकीदारांवर मनपाची नजर असणार आहे. यासह थकबाकीदारांचे नळ कनेक्शन देखील सील करण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहे. यासह कोरोनामुळे खबरदारी घेण्याचेही आदेश मनपा कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी मनपाची कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. यंदा ही वसुलीची टक्केवारी वाढावी यासाठी मनपाने जानेवारी महिन्यापासूनच वसुलीसाठी कंबर कसली होती. मनपाने जानेवारी महिन्यात अभय योजना राबवून मालमत्ताधारकांना काही प्रमाणात सुट देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे मनपाची वसुली काही प्रमाणात वाढली आहे. तसेच मालमत्ताकराच्या रक्कमेच्या वसुलीसाठी आता मनपाने विशेष वसुली मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून, यासाठी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वसुलीसह कोरोनाचे आव्हानही कायम

मनपाकडून प्रभाग समितीनिहाय प्रत्येकी तीन पथकांची नियुक्ती केली आहे. यामध्ये एकूण १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. थकीत कर्ज व उत्पन्न कमी यामुळे कोलमडलेल्या आर्थिक नियोजनामुळे हवालदील झालेल्या मनपा प्रशासनाने थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर वक्रदृष्टी केली आहे. सध्या महापालिकेच्या चारही प्रभाग समित्यांची वसुली ५० ते ६० टक्के इतकीच झाली आहे. आर्थिक वर्ष सपंण्यासाठी अवघे २६ दिवस बाकी असल्याने या २८ दिवसात ४० ते ५० टक्के वसुलीचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहेत. यासह एकीकडे वसुलीचे आव्हान मनपाला पार पाडावे लागणार आहे. तर दुसरीकडे मनपासमोर कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव यावर देखील प्रशासनाला नियोजन करावे लागणार आहे.

नळकनेक्शन ही केले जातील कट

मनपा आयुक्तांनी प्रभाग अधिकारी यांना १०० बड्या थकबाकीदारांच्या याद्या तयार करण्याचे आदेश दिले होते. या याद्या देखील तयार करण्यात आल्या असून, चौकाचौकात त्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. यासह ज्यांनी मालमत्ताकराची रक्कम भरली नाही. अशा नागरिकांचे नळ कनेक्शन देखील मनपाकडून कट करण्यात येणार आहे.

Web Title: Corporation's 'Recovery Mission' begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.