अमृतच्या खड्डयांत नगरसेविका जयश्री महाजनांची दुचाकी घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:38 AM2021-01-13T04:38:16+5:302021-01-13T04:38:16+5:30

जळगाव : चार दिवसांपूर्वी भुयारी गटारीच्या खड्डयांत मनसेेचे जिल्हा सचिव जमील देशपांडे यांच्या मुलाची दुचाकी पडल्याचा प्रकार ताजा असतानांच, ...

Corporator Jayashree Mahajan's two-wheeler fell into the pits of nectar | अमृतच्या खड्डयांत नगरसेविका जयश्री महाजनांची दुचाकी घसरली

अमृतच्या खड्डयांत नगरसेविका जयश्री महाजनांची दुचाकी घसरली

Next

जळगाव : चार दिवसांपूर्वी भुयारी गटारीच्या खड्डयांत मनसेेचे जिल्हा सचिव जमील देशपांडे यांच्या मुलाची दुचाकी पडल्याचा प्रकार ताजा असतानांच, सोमवारी सायंकाळी शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री सुनील महाजन यांची दुचाकी रामेश्वर काॅलनीच्या कार्नरजवळ घसरल्याची घटना घडली. या अपघातात जयश्री महाजन यांचा डावा हात मोडला असून, पायालाही दुखापत झाली आहे.

शहरात अमृत योजनेचे पाईप टाकण्यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. तसेच भुयारी गटारींच्याही कामामुळे रस्त्यांची अधिकच दुरवस्था होत आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नगरसेविका जयश्री महाजन या दुचाकीने रामेश्वर कॉलनीतील शाळेमधील कार्यक्रम आटोपून घरी येत होत्या. यावेळी रामेश्वर काॅलनीच्या काॅर्नरजवळ अमृतच्या खड्डयांची व्यवस्थित दुरूस्ती केली नसल्यामुळे, या खड्डयांत दुचाकी जोराने घसरली. अपघातानंतर महाजन यांना तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात महाजन यांचा उजवा हात मोडला असून, पायालाही मु्क्का मार लागला आहे. दरम्यान, हाताला जास्त दुखापत झाली असल्यामुळे, हातावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

अमृतच्या खड्डयांची व्यवस्थित डागडुजी करण्यात येत नसल्यामुळे, दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. भाजपने शहराला खड्डयात घातले आहे. सत्ताधारी फक्त टक्केवारीच्या राजकारणात गुंतले आहेत. हे त्यांचे अपयश असून, मनपा बरखास्त करण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना लवकरच प्रस्ताव देणार आहोत.

सुनील महाजन, विरोधी पक्षनेते

Web Title: Corporator Jayashree Mahajan's two-wheeler fell into the pits of nectar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.