तिकीट कापल्याने नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांचा भाजपाल ‘रामराम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:49 PM2018-07-11T13:49:10+5:302018-07-11T13:51:12+5:30
२५ वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य
जळगाव : गेल्या २५ वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य असलेले नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांना मनपा निवडणुकीत यंदा उमेदवारी नाकारलेल्या नाराज झालेल्या सोनवणे यांनी भाजपाला रामराम ठोकत भाजपाचे महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे नगरसवेक पदाचा राजीनामा दिला.
सोनवणे हे विद्यमान नगरसेवक असून त्यांना या निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सोनवणे यांनी बुधवारी भापजाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, २५ वर्षांपासून मी पक्षाशी एकनिष्ठ होतो तसेच मनपात नगरसेवक म्हणून चांगले काम केले. तरीदेखील तिकीट नाकारले. त्यामुळे सदस्य तसेच सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा देत असून कोणत्याही आघाडीवर नाव टाकले असल्यास त्याचाही राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे.