दारूमुक्तीसाठी नगरसेवकांची एकजूट

By admin | Published: May 13, 2017 12:51 AM2017-05-13T00:51:26+5:302017-05-13T00:51:26+5:30

जामनेर : पालिकेच्या सभेत दारू दुकान स्थलांतराच्या विषयावर चर्चा, नगराध्यक्षांचीही अनुकूलता

Corporators unite for emancipation | दारूमुक्तीसाठी नगरसेवकांची एकजूट

दारूमुक्तीसाठी नगरसेवकांची एकजूट

Next

जामनेर : येथील पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी दारू दुकानांना शहरात स्थलांतर  करण्यासाठी दिल्या जाणा:या कथित परवानगीस विरोध केला. यावर नगराध्यक्षांसह सत्ताधारी सदस्यांनीदेखील  पाठिंबा देऊन दारूमुक्तीसाठी  सर्वजण एकत्र असल्याचे सांगितले, तसे चित्र दिसूनही आले.
पालिकेच्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी  काँग्रेस आघाडीचे नगरसेवक पारस ललवाणी, रुपेश चिप्पड, सविता पाटील, नंदा चव्हाण, प्रा.उत्तम पवार, शोभा धुमाळ, अनिल बोहरा, सुनील नेरकर, जावेद इकबाल, रशीद, हसीनाबी मन्यार, सुनीता भोईटे आदींनी नगराध्यक्षांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, शहरातील दोन देशी दारू दुकानदारांनी त्यांचे दुकान बशीरनगर व गणेशवाडी भागात स्थलांतरित करण्यासाठी परवानगी मागितली आहे. या भागात प्रार्थना स्थळे, शाळा असून संमिश्र वस्ती आहे. परिसर संवेदनशील असून दारू दुकानांना परवानगी दिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
नागरिकांची भावना लक्षात घेऊन स्थलांतरास परवानगी नाकारावी व भविष्यातदेखील बिअरबार, वॉईनशॉप व देशी दारू दुकानांना नाहरकत देऊ नये. नगराध्यक्षा साधना महाजन यांनी या विषयी अनुकूलता दर्शविली.
 सभेत शहरात सुरू असलेल्या कोटय़वधीच्या विकास कामांबाबत चर्चा सुरू असतानाच भाजपचे गटनेते महेंद्र बाविस्कर यांनी थेट नगराध्यक्षा साधना महाजन यांना सांगितले की, कोटय़वधीची विकास कामे मंजूर झालेली असली तरी संबंधित ठेकेदार काम करीत असल्याचे कुठेच दिसत नाही.बाविस्कर यांच्या या भूमिकेवरून  सदस्यांमध्ये चर्चा होत होती.
पालिकेतर्फे सुरू असलेल्या विकास कामांपैकी नुकताच आठवडे बाजारात बांधण्यात येत असलेल्या जलकुंभाच्या भूमिपूजन सोहळा झाला. या कार्यक्रमास आघाडीच्या नगरसेवकांना बोलाविण्यात आले नाही, हा मुद्दा धरून पिंटू चिप्पड व जावेद रशीद यांनी नगराध्यक्षांना सांगितले की, विकास कामात आमचाही सहभाग असल्याने भूमिपूजनास आम्हालाही बोलाविले जावे.
  पालिका ही काही कुणा एकाची प्रायव्हेट कंपनी नव्हे, असेही जावेद यांनी सांगितले. या बैठकीस नगरसेवक छगन झाल्टे, श्रीराम महाजन, इस्माईल खान, कल्पना पाटील, शहनाजबी न्याजमहम्मद, सुनीता बेनाडे, महेंद्र बाविस्कर व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर उपस्थित होते. 

Web Title: Corporators unite for emancipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.