स्मशानभूमीत प्रेतांचे खच, कुत्रे तोडतायत लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 01:08 PM2021-04-15T13:08:58+5:302021-04-15T13:12:52+5:30

जिवंतपणी तडफडणारे आयुष्य स्मशानभूमीतही चिरनिद्रा घेऊ शकत नाही. उलट अनेक मृतदेहांचे कुत्रे लचके तोडत आहेत. ही भीषण दृश्ये सध्या अमळनेरात पहायला मिळत आहेत.

Corpses in the cemetery, dogs breaking limbs | स्मशानभूमीत प्रेतांचे खच, कुत्रे तोडतायत लचके

स्मशानभूमीत प्रेतांचे खच, कुत्रे तोडतायत लचके

googlenewsNext
ठळक मुद्देअस्थी मिळेना, प्रेतांच्या विटंबनेने नातेवाईक संतप्तअंत्यसंस्काराचे विभाजन करण्याचे नगरसेवकांसह नागरिकांचे प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : स्मशानभूमीत प्रेतांचे प्रमाण वाढल्याने अस्थी घेणाऱ्या लोकांना अस्थी मिळत नाही तर अर्धवट जळालेल्या प्रेतांची लचके कुत्रे तोडत असल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्याने अंत्यसंस्कार विविध स्मशानभूमीत करण्यात यावेत अशी मागणी पैलाड शनीपेठ , ताडेपुरा भागातील नगरसेविका संगीता पाटील यांच्यासह सुमारे १०० नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

पैलाड स्मशानभूमीत सुमारे दररोज १० ते १२ प्रेत अंत्यसंस्कारासाठी येत असून परिसरात खाली जमिनीवर सुद्धा जागा उपलब्ध नाही त्यामुळे प्रेते पूर्ण न जळता अपूर्ण जळत आहेत. त्यात काही कुत्रे प्रेतांची लचके तोडत आहेत आणि बाहेर रस्त्यावर घेऊन जात आहेत. नातेवाईकांना त्यामुळे दुसऱ्या दिवशी अस्थीदेखील मिळत नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.

 प्रेतांची विटंबना होत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कार विभागले जाऊन सानेनगर, खलेश्वर, धार रस्ता या स्मशानभूमीत करण्यात यावेत. त्याठिकाणी पालिकेने लाकडांची व्यवस्था करण्यात यावी किंवा शहराबाहेर मोकळ्या जागेत अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका संगीता पाटील, शिवसेना शहर प्रमुख संजय पाटील, प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार, नगरसेवक संजय भिल, नगरसेविका राधाबाई संजय पवार, नगरसेवक सुरेश आत्माराम पवार,  रणजित रामचंद्र पाटील, अमरजीत पाटील, संजय नवल पाटील, विजय पाटील,भटू फुलपगारे, विश्वजित पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह १०३ लोकांनी आमदार अनिल पाटील ,प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांना दिले आहे.

Web Title: Corpses in the cemetery, dogs breaking limbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.