यावल परीक्षा केंद्राबाहेर हांणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:01 PM2019-03-06T12:01:48+5:302019-03-06T12:02:08+5:30

दोन विद्यार्थी गंभीर

Corruption outside the Yaval Exhibition Center | यावल परीक्षा केंद्राबाहेर हांणामारी

यावल परीक्षा केंद्राबाहेर हांणामारी

Next
ठळक मुद्देसात जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल



जळगाव : साने गुरुजी माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावरील इंग्रजी विषयाचा पेपर देवून केंद्राबाहेर आलेल्या दोन विद्यार्थ्यांना एका गटाकडील गणेश कोलते व त्याच्या सोबतच्या सहा ते सात जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याने दोघे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे शहरात काही काळ काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले. संशयीत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे.
न.पा.संचलित साने गुरुजी विद्यालयात मंगळवारी इंगजी विषयाचा पेपर झाल्यानंतर १७ नंबरचा फॉर्म भरून चोपडा येथील परवेज मुसा तेली (१९, रा.चोपडा) व दानिश इरफान बेग (२२, रा. चोपडा) हे परीक्षा देण्यासाठी आले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास परीक्षा देवून दोघेही बाहेर आले. त्यांना यावल येथील गणेश राजू कोलते व अन्य अनोळखी सहा ते सात मुलांनी बेदम मारहाण केली. परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस व काही नागरिक तसेच शिक्षक भूषण नगरे, विनोद गायकवाड आदींनी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांपासून सोडवले. विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्यावरून झाली असल्याची चर्चा होती.

Web Title: Corruption outside the Yaval Exhibition Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.