पोलिसांपाठोपाठ आरटीओतही भ्रष्टाचाराचा कित्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:40+5:302021-06-03T04:12:40+5:30
सुनील पाटील पोलिसांपाठोपाठ आरटीओतही भ्रष्टाचाराचा कित्ता गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस दलातील भ्रष्टाचाराने पोलीस व राजकीय क्षेत्र ढवळून निघालेले असतानाच ...
सुनील पाटील
पोलिसांपाठोपाठ आरटीओतही भ्रष्टाचाराचा कित्ता
गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस दलातील भ्रष्टाचाराने पोलीस व राजकीय क्षेत्र ढवळून निघालेले असतानाच आता तोच कित्ता परिवहन अर्थात आरटीओ विभागात गिरविला जात आहे. त्याचीही राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना पदावरून हटविल्यानंतर त्यांनी थेट गृहमंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याआधी सचिन वाझे यांचे प्रकरण चर्चेला आले. नंतर परमबीर सिंग व वाझे या दोघांच्या प्रकरणाचे धागेदोरे एकमेकांशी जुळून आले. थेट गृहमंत्र्यांवर आरोप झाल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आताही आरटीओतील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी भ्रष्टाचाराचा बॉम्बगोळा टाकून राज्यात खळबळ उडवून दिली. नाशिक पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत त्यांनी थेट परिवहन मंत्री अनिल परब व खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांवर आरोप केले. वाझे व परमबीर सिंग प्रकरणातही परब यांच्यावर आरोप झाले होते. आरटीओतील वाहन नोंदणी, बदल्या व पदोन्नत्यांचा हा विषय जळगाव, नाशिक व धुळे भोवतीच फिरत आहे, खरे तर हे सूत्र संपूर्ण महाराष्ट्रात लागू होते. प्रत्येक जिल्ह्यात वाहन नोंदणी, बदल्या व पदोन्नत्या आहेत, मग या तीनच जिल्ह्यांचा विषय कसा? या प्रकरणात सचिव, आयुक्त या आएएस अधिकाऱ्यांची चौकशी झाली. राजीनामा मात्र कोणाचा झालेला नाही. एकूणच पोलीस व आरटीओ या दोन्ही विभागात एकच कित्ता गिरविला जात आहे.