परिवहन विभागातील भ्रष्टाचाराची केंद्राकडून चौकशी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:00+5:302021-06-11T04:13:00+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातील कथित तीनशे कोटींच्या भ्रष्टाचाराची केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी छावा मराठा ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातील कथित तीनशे कोटींच्या भ्रष्टाचाराची केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी, अशी मागणी छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे. परिवहन खात्यातील अधिकारी गजेंद्र पाटील यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह इतर सहा अधिकाऱ्यांच्या विरोधात तीनशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी पुराव्यानिशी तक्रार दाखल केलेली आहे. या प्रकरणाची या केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
------------------
उपोषण घेतले मागे
जळगाव : महाराष्ट्र राज्य स्थापत्य विभाग महावितरण येथील कार्यकारी अभियंता अनिरुद्ध रायप्पा व साहाय्यक अभियंता सुकेश बिराजदार यांच्या विरोधात जिल्हा स्थापत्य महावितरण कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे सदस्य भाग्येश ढाकणे, विवेक खर्चे, नीलेश चौधरी व हर्षल सोनवणे यांनी ८ जूनपासून बेमुदत उपोषण पुकारले होते. दरम्यान, अधीक्षक अभियंता यांनी मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांना अमोल कोल्हे यांच्या हस्ते ज्यूस देऊन गुरुवारी उपोषण मागे घेण्यात आले आहे.